Eknath Shinde : बच्चू कडू-राणांमध्ये पॅचअप ?; CM शिंदे समेट घडविण्यात यशस्वी ठरणार का ?

Eknath Shinde : एकमेंकावर आरोप न करण्याच्या सूचना कडू आणि राणा यांना शनिवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
Eknath Shinde latest news
Eknath Shinde latest newssarkarnama

CM Eknath Shinde : गेल्या काही दिवसापासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वाद पेटला आहे. वाद मिटवण्यासाठी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे मध्यस्थी करतील अशी शक्यता आहे. कडू-राणा यांच्यातील वाद मिटण्यासाठी एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत. एकमेंकावर आरोप न करण्याच्या सूचना कडू आणि राणा यांना शनिवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आमदार रवी राणा व बच्चू कडू या दोघांची 'वर्षा' या आपल्या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कडू आणि राणांमध्ये पेटलेल्या राजकीय वादावर आज तोडगा निघणार का?, याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिंदे गटाची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनीही रवी राणांच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath Shinde latest news
Bharat Jodo Yatra : 'रिस्पॉन्स' साठी 'परफॉर्मन्स' चांगला ठेवा ; राहुल गांधींची भाजपनं उडवली खिल्ली

"एका जिल्ह्याच्या वादामुळे राज्याच्या 40 आमदारांची बदनामी करण्याची गरज नाही. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असा होतो. त्यामुळे रणी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आता रवी राणांना आवरावे," अशी विनंतीही गुलाबराव पाटलांनी केली आहे.त्यानंतर लवकरच हा वाद मिटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Eknath Shinde latest news
Saffron Project : महाराष्ट्रात चाललयं तरी काय ? : आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेला !

बच्चू कडू यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत रवी राणा यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करा, असे सांगत इशारा दिला होता. त्यामुळं राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं.आज (रविवारी) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना रवी राणा यांना मुंबईला बोलावलं असल्याचं रवी राणा यांनी सांगितलं.

रवी राणा मुंबईसाठी अमरावतीहून रवाना झाले आहेत. रवी राणा म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. नेत्यांनी बोलावल्यानंतर जावं लागतं. म्हणूनच आज मी मुंबईत दोघांची भेट घेणार आहे. नेते मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे वागणे, हे आमचे कर्तव्यच आहे,"

"मी गुवाहीटाला जाऊ नये असं अनेकांना वाटत होतं. अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे मला फोन आले. त्यामुळे गुवाहाटीला भेटून परत यायचं असं माझं ठरलं होतं. मी सोबत आहे इतकं सांगून मला परत यायचं होतं. मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही,"असे कडू यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in