Ravi Rana : फडणवीसांच्या भेटीनंतर राणांची दिलगिरी ; बच्चू कडू त्यांचे शब्द मागे घेतील का ?

Ravi Rana : आम्ही दोघेंही शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिंशी खंबीरपणे उभे आहोत,"
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi Rana
Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi RanaSarkarnama

Ravi Rana : आमदार बच्चू कडू यांनी गुवाहाटीमध्ये ५० खोके घेतले, या आमदार रवी राणा यांच्या विधानावरुन वाद पेटला होता. या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे, कारण रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणा माध्यमांशी बोलत होते. आता बच्चू कडू त्यांचे शब्द मागे घेतील का, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईत आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले होते. त्यानुसार, काल रात्री 10 वाजताच्या सुमारास बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर बच्चू कडू, रवी राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास अडीच तास बैठक झाल्याचे बोलले जात आहे.

Bacchu Kadu, Eknath Shinde, Devendra Fadanvis and Ravi Rana
शिंदे-फडणवीस करणार ठाकरेंची कोंडी ; CAG करणार BMC च्या कारभाराची चौकशी

रवी राणा म्हणाले,"बोलता-बोलता आमच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. माझ्याकडू काही अपशब्द निघाले आहे.बच्चू कडू यांनीही माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. मी माझे विधान मागे घेतो. बच्चू कडू हेही आपले शब्द मागे घेतील ही अपेक्षा. माझ्याकडून कोणी दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.आम्ही दोघेंही शिंदे-फडणवीस सरकारच्या पाठिंशी खंबीरपणे उभे आहोत,"

"महाराष्ट्राचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षात प्रश्न सोडवू शकले नाहीत. पण तीन महिन्यात या सरकारने कामे मार्गी लावण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आमच्या वादापेक्षा सरकार सुरळीत चालणं महत्त्वाचं आहे. माझ्या शब्दांनी कुणाचं मन दुखावलं असेल, आमदारामंध्ये गैरसमज झाले असतील तर शब्द मागे घेत आहे. बच्चू कडू यांनीही शब्द मागे घ्यावे " असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

राणा-कडू यांच्यात आठ दहा दिवसांपासून वाद सुरू होता. आरोप-प्रत्यारोप होत होते. "एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी आम्हाला बोलावलं. सीएम बंगल्यावर साडेतीन तास चर्चा झाली. मतभेद होते. काही वाक्य न पटणारी होती. त्यावरही चर्चा झाली. भाषेवरही चर्चा झाली. आम्ही दोघे अमरावतीचे आमदार. दोघेही सरकारसोबत आहोत," असं रवी राणा म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com