Shivsena - BJP Alliance: आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्याचं महत्वाचं टि्वट ; यापुढच्या काळात भाजपसोबत...

Shivsena - BJP Alliance : एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार
Amit Shah - Eknath Shinde - Devendra fadnavis
Amit Shah - Eknath Shinde - Devendra fadnavisSarkarnama

Shivsena - BJP Alliance: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (रविवारी) भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत ही बैठक होती, असे समजते. अमित शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वाचं टि्वट केलं आहे.

राज्याता आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका हा भाजपसोबत लढणार असल्याचे टि्वट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Amit Shah - Eknath Shinde - Devendra fadnavis
Odisha Train Tragedy : ओडिशा रेल्वे अपघातानंतर गौतम अदानींची मोठी घोषणा ; घेतली 'ही' जबाबदारी

"यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार," असा विश्वास त्यांनी टि्वट करीत व्यक्त केला आहे.

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर ट्वीट करत एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असल्याचे म्हटले आहे.

Amit Shah - Eknath Shinde - Devendra fadnavis
Gulabrao Patil News : तुम्हाला मी पक्षात नको असेल तर तसे सांगा ; गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांना..

एकनाथ शिंदे ट्विटरमध्ये म्हणतात..

रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत.

राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com