Eknath Shinde : भुमरेंचे शक्तीप्रदर्शन ; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी दुभाजक फोडले..

Sandipan Bhumre : धुळे-सोलापूर महामार्गावरील पुलाला लागून असलेला डिव्हाडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी फोडण्यात आले आहे.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 12 सप्टेंबर रोजी औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात दौऱ्यावर येत आहेत. राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार व सभा होणार आहे. (Eknath Shinde latest news)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याची जोरदार तयारी मंत्री संदिपान भुमरे यांनी सुरू केली आहे. शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच पैठण दौरा असणार आहे.

चिकलठाणा विमानतळावरून बीड बायपास मार्गे नव्या सोलापूर-धुळे महामार्गावरून मुख्यमंत्र्यांचा ताफा पैठणकडे रवाना होणार आहे. परंतु या रोडवर दुभाजक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना वळसा घालावा लागू नये, म्हणून चक्क डिव्हायडर तोडण्यात आला आहे.

Eknath Shinde
Congress President : कॉंग्रेसच्या पाच खासदारांचा 'लेटर बॅाम्ब' : निवडणुकीबाबत चिंता

धुळे-सोलापूर महामार्गावरील पुलाला लागून असलेला डिव्हाडर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी फोडण्यात आले आहे. अनेक दिवसापासून याच रस्त्यावर औरंगाबाद शहरात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे तिथे छोटे मोठे अपघात देखील झाले. याकडे मात्र संबंधित विभागाचे आतापर्यंत दुर्लक्ष होते. ते खड्डे देखील बुजवण्यात आले आहेत.

Eknath Shinde
Rohit Pawar : भाजप नेत्यांनो, बारामती या, विकास बघा ; पवारांचे बावनकुळेंना सडेतोड उत्तर

आता खुद्द मुख्यमंत्री या रस्त्याने जाणारं म्हटल्यावर संबंधित विभाग खडबडून जागा झाला आहे. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामुळे का होईना खड्डे बुजले याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. यानिमित्ताने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी भुमरे यांनी चालवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in