Eknath Shinde : शिंदेंकडून आदित्य ठाकरेंना झटका; ठाण्यात युवासेनेला पाडले खिंडार

राज्यभरातून शिंदे यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे.
CM Eknath Shinde Latest Marathi News
CM Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा वाढत चालला आहे. प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील सेनेसह युवा सेनेचे बहुतेक पदाधिकारी आता शिंदे यांच्या पाठिशी उभे राहिल्याचे चित्र आहे. रविवारी ठाणे जिल्ह्यातील शेकडो युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला. त्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जोरदार झटका बसला आहे. (CM Eknath Shinde Latest News)

शिंदे गटात दाखल झालेले आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि त्यांचे पुत्र युवासेनेचे सचिव पुर्वेश यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवासैनिकांनी रविवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे झालेल्या कार्यक्रमावेळी प्रताप सरनाईकही उपस्थित होते.

CM Eknath Shinde Latest Marathi News
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींनी साधला माध्यमांशी संवाद

एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर त्यांना पाठिंबा वाढत चालला आहे. त्याची सुरूवात ठाण्यातून झाली. त्यानंतर कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर येथील शिवसेनेच्या अनेक नगरसेवकानी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेदेखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील युवा सेनेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला आहे.

रत्नागिरी, औरंगाबाद, पुणे, मुंबईसह राज्यातील आणखी काही जिल्ह्यांती पदाधिकाऱ्यांकडून शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला जात आहे. त्यामुळे शिवसेनेची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढत चालली आहे. शिंदे यांच्या समर्थकांची पक्षातून हकालपट्टी करून नव्या नियुक्त्या केल्या जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in