'मविआ'ला आणखी धक्के बसणार; मुर्मू यांना 200 आमदारांची मतं देण्याचं शिंदेंनी केलं जाहीर

मुर्मू यांना शिवसेनेेने पाठिंबा जाहीर केला आहे.
Droupadi Murmu Latest Marathi News, CM eknath Shinde News
Droupadi Murmu Latest Marathi News, CM eknath Shinde NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेला जोरदार झटका दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे चाळीस आमदार फोडल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा काँग्रेस व राष्ट्रवादीकडे वळवण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना आमदारांची 220 मतं देऊ, असं शिंदे यांनी जाहीर केलं आहे. (CM Eknath Shinde News)

शिंदे यांच्या या घोषणेमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मुर्मू या गुरूवारी मुंबईत होत्या. भाजप आणि शिंदे गाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत चाचणीवेळी 164 आमदारांचा पाठिंबा होता. तर आघाडीकडे 99 आमदार होते. त्यानंतर आता शिंदे यांनी मुर्मू यांना 200 आमदारांची मतं देऊ, असं जाहीर केलं आहे.

Droupadi Murmu Latest Marathi News, CM eknath Shinde News
पंतप्रधान मोदींनीही एकनाथ शिंदेंचं 'ते' भाषण संपूर्ण ऐकलं अन् म्हणाले...

शिवसेनेने (Shiv Sena) मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्याकडील 14 मतं मुर्मू यांनाच मिळणार आहेत. तर उर्वति 22 मतं शिंदे कुठून आणणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यावेळी मुर्मू यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळतील, असं म्हटलं आहे.

भाजपने राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीला धक्का दिला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. त्यामुळे आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होणार का, याबाबत चर्चांना वेग आला आहे.

Droupadi Murmu Latest Marathi News, CM eknath Shinde News
संजय शिरसाट त्यावेळी आघाडीवर होते, कधी करणार, कधी करणार म्हणायचे!

दरम्यान, युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रविवारी (ता. 17) मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानं हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच सिन्हा हेही मुंबईत येणार नसल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com