Eknath Shinde News : शरद पवारांच्या टीकेवर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सडेतोड उत्तर..

Eknath Shinde News : "सत्ता हाती असली तरी पाय जमिनीवर पाहिजे," अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
Eknath Shinde ,Sharad Pawar
Eknath Shinde ,Sharad Pawarsarkarnama

Eknath Shinde News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar) काल (रविवारी) कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "सत्ता हाती असली तरी पाय जमिनीवर पाहिजे," अशा शब्दात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

"सत्तेची कोणतीही हवा आमच्या डोक्यात गेलेली नाही,आम्ही कालही कार्यकर्ता होतो,आजही कार्यकर्ता आहोत," असे एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे.पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

लोहारा येथे बडगुजर समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते.यावेळी मंत्री गुलाबराव पाटील,गिरीश महाजनआमदार किशोर पाटील,आमदार चिमणराव पाटील,मुख्य आयोजक नरेंद्र बडगुजर,आदी उपस्थित होते.

Eknath Shinde ,Sharad Pawar
Maratha Kranti Morcha : राज्यपालांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने आखली 'ही' रणनीती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी सत्ताधारी हवेत असल्याची टीका केली होती, त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "लोक आम्हाला राजे म्हणतात पण आम्ही राजे नाहीत जनता राजा आहे, आम्ही सेवक आहोत,आमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली नाही आणि जाणारही नाही.आम्हाला लोकांचा पाठींबा मिळत असल्याने कामात गती आणि आत्मविश्वस येत आहे,"

Eknath Shinde ,Sharad Pawar
Raj Thackeray News : राणे-राऊत काय बोलले हेच सुरु असतं, पवार मध्येच बोलतात, यामुळे मी काहीही बोलत नाही..

"दिलेला शब्द पाळणे हा माझा स्वभाव आहे,त्यामुळे ५० जण सोबत आले,शब्द देताना विचार करतोआज पर्यंत शब्द फिरविला नाही म्हणून लोकांचा विश्वस संपादन करू शकलो,बाळासाहेबांची भूमिका,आणि आनंद दिघे यांचा आदर्श या आधारेच आपण कामकाज करीत असून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अनेक जनहीताचे निर्णय घेतले. मिळालेली सत्ता समाजातील प्रत्येक घटकांच्या आणि राज्याच्या उन्नतीसाठी आपण वापरणार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com