डिसले गुरुजींना दिलासा ; ग्लोबल टिचरबाबत चुकीचं काम होऊ नये.., मुख्यमंत्र्यांकडून आदेश

आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेल्या या गुरुजींनी कंटाळून आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
global teacher award winner ranjitsinh dislay guruji
global teacher award winner ranjitsinh dislay gurujisarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते (Global Teacher Award)जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले (ranjitsinh dislay guruji) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय ख्याती मिळालेल्या या गुरुजींनी कंटाळून आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. (ranjitsinh dislay guruji latest news)

वादात सापडलेल्या डिसले गुरुजींनी आज मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदेंनी डिसले गुरुजींबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. "आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये," अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. यामुळे डिसले गुरुजींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

global teacher award winner ranjitsinh dislay guruji
..मग मंत्रीपदासाठी भांडणे का ? एकनाथ खडसेंचा बंडखोर आमदारांना सवाल

शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रीमंडळाची बैठक होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डिसले गुरुजींच्या चौकशीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीस म्हणाले, "डिसले गुरुजी आज मला आणि मुख्यमंत्र्यांना भेटले.मुख्यमंत्र्यांनी डिसले यांचं म्हणणं ऐकूण घेतलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आंतरराष्ट्रीय अवार्ड मिळालेल्या शिक्षकाबाबत चुकीचं काम होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, याबाबत मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.चुकीचे काम होऊ नये याबाबत सर्व आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत,"

सरकारी पद्धतीने आवश्यक तेथे परवानगी न घेता डिसले गुरुजी यांनी कामकाज केले. अधिकार नसताना पासवर्ड वापरून वेतन काढले. हजेरीपत्रक नसणे, प्रतिनियुक्तीच्या कालावधीत उपस्थिती सिद्ध न करता येणे, असा ठपका जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने अहवालाद्वारे त्यांच्यावर ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com