Indore-Amalner bus accident news update
Indore-Amalner bus accident news updatesarkarnama

इंदूर- अमळनेर बस अपघात : मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर

Indore-Amalner bus accident |आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे.

मुंबई : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात आज (सोमवारी) सकाळी इंदूर-खरगोनदरम्यान भीषण अपघात (madhya pradesh bus accident) झाला. यात तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी जाहीर केली आहे. (Indore-Amalner bus accident news update)

एकनाथ शिंदे म्हणाले,"मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आहे. या घटनेबाबत मध्यप्रदेश सरकार एका मंत्र्याची नियुक्ती केली आहे,"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेत. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या. मुख्यमंत्री स्वतः मदत कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिलेली माहितीनुसार, ही बस जळगांव जिल्हयातील अमळनेर आगाराची होती. इंदूर येथून सकाळी साडे सात वाजता बस सुटली. अमळनेरही ही बस निघालेली असताना नर्मदा नदीवर बसला अपघात झाला. त्यानंतर पुलाचा कठडा तोडून ही बस नदीत कोसळली.

 Indore-Amalner bus accident news update
BJP : भाजप महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला; व्हिडिओ व्हायरल

बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह 40 प्रवासी होते. आतापर्यंत 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यामध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख पटवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करत दु:ख व्यक्त केलं आहे."ही घटना अत्यंत दु:खद असून ज्यांचा या घटनेत मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो," असं मोदी यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत टि्वट केलं आहे. शोध आणि बचावकार्य वेगाने सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करुन सद्यपरिस्थितीची बाबत माहिती दिली.

घटनास्थळी खरगोन व धार चे जिल्हा प्रशासन पोहोचले आहेत. एसटी बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेल्पलाईन क्रमांक

  • घटनास्थळी मदतीसाठी 09555899091

  • जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष 02572223180, 02572217193

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com