Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणाले, 'त्या' अधिकाऱ्याचा कार्यक्रम करणार ; लगेच तलवार काढायला लावता..!

Maharashtra Winter Session 2022 : अहो, ते कार्यक्रम नाही तर निलंबनाच्या कारवाईची मागणी करताय..
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Maharashtra Winter Session 2022 : कोयना धरणासाठी विस्थापित झालेल्यांना अजूनही जमिनीचे वाटप झालेले नाही. हे काम अद्याप सुरूच आहे. या प्रकरणात सोलापूरमधील एका अधिकाऱ्याने काही प्रकल्पग्रस्तांना एकाच जमिनीचे दोनदा वाटप केल्याचे नुकतेच समोर आले आहे. (Maharashtra Winter Session 2022 Eknath Shinde)

आज अधिवेशनात आमदार राम शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. संबधित अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर उत्तर देतानाच विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी शिंदेंना थांबवत शिंदे यांच्या मागणीबाबत स्पष्टीकरण दिले.

आमदार शिंदे यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावर "अहो आम्हाला येऊन आता कुठे 4-5 महिनेच झालेत आणि लगेच तलवार काढायला लावता. काही तरी वेळ द्या. येत्या दोन महिन्यांत त्या अधिकाऱ्याचा कार्यक्रम करणार,'असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावर सभापती निलम गोऱ्हे मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, "'अहो, ते कार्यक्रम नाही तर निलंबनाच्या कारवाईची मागणी करताय'

"संबधीत अधिकाऱ्यांची दोन महिन्यांत चौकशी करून दोषी आढळणाऱ्या त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणार,"असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही.त्यानंतर या विषयावर एक समिती स्थापन करणार असल्याचे सांगितले.

Eknath Shinde
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना दिलासा नाहीच ; कारागृहातील मुक्काम वाढला..

"विरोधी पक्षातील नेत्यांनाही या समितीत स्थान देऊ आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी काढू," असे मुख्यमंत्री म्हणाले, यावर विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी समिती स्थापन करून फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याते आदेश दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

'कोयना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न हा काही आताचा नाही. गेल्या 60 वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांची मदत रखडलेली आहे. आम्हाला येऊन केवळ काही महिने झाले आहेत. आणि लगेच तलवार कशी काढायला सांगता. प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या जमिनीत ज्या अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला, त्याला सरकार सोडणार नाही. येत्या दोन महिन्यांत चौकशी करून कारवाई करण्यात येईल'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com