Eknath Shinde News: भुजबळांनी मुद्दा उपस्थित केला..; मुख्यमंत्री मोदींना भेटणार..

Maharashtra Budget Session : तत्कालीन मंत्र्यांना भेटून या प्रकरणी केंद्राने गती देण्याचा प्रयत्न केला.
Eknath Shinde - Narendra Modi
Eknath Shinde - Narendra Modisarkarnama

Marathi Rajbhasha Gaurav Din: कविवर्य कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहे. याचे पडसाद आजपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले.

राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री छगन भूजबळ यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

Eknath Shinde - Narendra Modi
Shiv Sena : 'गुढीपाडव्याला 'सिनेमा' दाखवणार,' असं राज ठाकरे म्हणताच हशा पिकला ; पण, विरोधकांचे धाबे दणाणले..

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी आमच्या सरकारने सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडली असून सर्वपक्षीयांनी एकत्र आल्यास भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत," असे भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ यांच्या या मुद्दांवर भाजपचे नेते, माजी मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले,"दिल्लीतील असलेल्या बाबूंकडे काही गोष्टी परखडपणे मांडल्या आहेत. २०१७-१८ मध्ये तत्कालीन मंत्र्यांना भेटून या प्रकरणी केंद्राने गती देण्याचा प्रयत्न केला.

Eknath Shinde - Narendra Modi
Gautami Patil च्या Viral Videoची चाकणकरांनी घेतली दखल ; पोलिसांना दिला आदेश..

"मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अंतिम टप्पा गाठायचा आहे. विधानसभेतील सगळ्यांनी मिळून एकत्र दिल्लीत गेले पाहिजे. मराठी भाषा बोलीभाषेपुरती मर्यादित न राहता ज्ञानभाषा आणि अभिजात भाषेचा दर्जा व्हावा याकरता आमचं १०० टक्के समर्थन आहे,”

भुजबळ यांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार," असे शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in