`एकनाथ शिंदेंना काय मिळणार, असे विचारायचे पण फडणविसांनी मोठेपणा दाखवला`

Eknath Shinde news| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडे 164 आमदारांचं बहुमत असल्याचे सिध्द झाले.
Eknath Shinde news|
Eknath Shinde news|

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिंदे भाजप गटाने बहुमत मिळवले आणि राहुल नार्वेकरांची (Rahul Narvekar) विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडे 164 आमदारांचं बहुमत असल्याचे सिध्द झाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे सरकारने 164 चा आकडा गाठला. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ``अध्यक्षांची उच्च अशी परंपरा विधानसभेला लाभली आहे. दादासाहेब माळवंणकर, शिवराज पाटील हे विधानसभेचे अध्यक्ष होते. ते पुढे लोकसभेचे अध्यक्ष झाले. या अध्यक्षपदाचा लौकीक आपण वाढवाल, असा गौरव शिंदे यांनी केला. याचवेळी राज्यात आज शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झालं, असं म्हणताच करताच सेनेकडून विरोधाच्या घोषणा देण्यात आल्या. यापुढे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन सरकार चालवणार, असही त्यांनी सांगितलंं.

Eknath Shinde news|
बाळासाहेब आजबेंनी थोपटला विधानसभेत दंड

एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 115 आमदार असताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. सगळ्यांना वाटलं होत की देवेंद्र हे मुख्यमंत्री होतील. मग मला काय भेटणार? पण भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला. जे वातावरण होतं ते आता बदललं आहे. अनेक आमदार माझ्यासोबत होते. विरोधकांनी त्यातील काही आमच्या विरोधकांच्या संपर्कात असल्याचा दावा करत होते. पण मी म्हणत होतो की त्यांची नावे सांगा मी चार्टर विमानाने पाठवून देतो. पण तसे घडले नाही. एकाला परत जायच होतं त्याला चार्टर्ड विमानाने पाठवून दिलं, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

एकीकडे मोठे नेते होते, दुसरीकडे दिघेंचे सैनिक होते. आम्हाला अनेक प्रलोभने दाखवली गेली. पण माझ्या 50 लोकांनी शिवसेना-भाजपला मतदान केलं, माझ्याकडे कमी आमदार असतानाही भाजपने मला मुख्यमंत्री पदाला समर्थन दिलं, देवेंद्र फडणवीसांनीही मोठे मन दाखवले. माझ्यासोबत असलेल्या 50 जण एकत्र राहिले. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे आभार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com