
Eknath Shinde : शिवसेनेचे नेते आणि आता मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड करत आपल्यासोबत सुमारे 40 आमदारांना बंड केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळाली. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. परिणामी महाविकास आघाडी सरकार कोसळले.
शिवसेनेत पडलेली उभी फुट आणि पक्षाच झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. दरम्यान बंडखोर आमदार देखील ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करत आहेत. सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी आज मुंबईत शिंदेंचे समर्थन करत शक्तिप्रदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणातून टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. (Chief Minister Eknath Shinde Marathi Latest News)
शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आमच्याबद्दल काही पण बोलले जात असून त्याला काही तंत्र राहिलेले नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर एकमेकांमध्ये भांडतील, असे बोलले जात आहे. काही जणांनी तर आमच्यात फूट पडावी आणि मतभेद व्हावेत, यासाठी देव पाण्यात ठेवलेत. मात्र आमचे आमदार घट्ट असून माझ्याकडे अनेक कलाकार आहेत. ते काय करतील ते तुम्हाला कळणारही नाही. आमच्यात मतभेद होणार नसून उलट हेच आमदार तुमच्यावर भारी पडतील,असा इशाराच त्यांनी दिला.
दरम्यान, आपल्या भाषणत पंतप्रधान मोदींनी विधिमंडळातील आपल्या भाषणाचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर आपण शिवसेनेसाठी आयुष्यभर काम केले मग आम्ही बंडखोर कसे? असा सवालही उपस्थित केला. याआधी आमदारांच्या मनातील भावना आपण अनेकदा बोलून दाखवल्या. मात्र त्या ऐकून घेतल्या गेल्या नाही. सत्तेत असूनही आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर जात असल्याने हे पाहून काळीज तुटत होतं. मग छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी हा कठिण निर्णय घेतला आणि शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही हा उठाव केल्याचे शिंदेंनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.