विघ्नहर्त्याने राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पु्न्हा डिवचलं

CM Eknath Shinde| देवेंद्र फडणवीसांकडे प्रचंड इच्छाशक्ती होती आणि मी त्याप्रमाणे काम केलं.
 CM Eknath Shinde|
CM Eknath Shinde|

मुंबई : ''विघ्नहर्त्याने राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही, असं मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) व्यक्त केलं. मेट्रो ३ च्या चाचणीला आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. मंगळवारी (३० ऑगस्ट) कुलाबा-वांद्रे-सिप्स मेट्रो लाइन-३ च्या प्रोटोटाईप ट्रेन चाचणी कार्यक्रमात ते बोलत होते. याचवेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला.

आज संपूर्ण महामार्ग पूर्णत्वास जात आहे. आता लवकरच आपण नागपूर ते शिर्डी या महामार्गाचंही उद्घाटन करणार आहोत. विघ्नहर्त्याने या राज्यावरील बरीचशी विघ्नं आता दूर केली आहेत. त्यामुळे आता विघ्नं येतील असं मला वाटत नाही. असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

 CM Eknath Shinde|
ACB Action: चक्क शौचालयात घेतली दहा हजाराची लाच

फडणवीस सरकार काळातील कामांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात शिंदे-फडणवीस युतीचं सरकार येऊन आज दोन महिने झाले आहेत. ३० जूनला माझा आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला होता. आज आम्हाला या मेट्रो-३ चाचणीसाठी हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे आभार मानतो. मेट्रो प्रकल्पामुळे साडेसहा लाख वाहनांची संख्या कमी होईल, १७ लाखाहून अधिक प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील. पर्यायाने प्रदुषण कमी होईल, वेळ वाचेल आणि महत्त्वाचं म्हणजे साडेतीन लाख लिटर इंधन वापर कमी होईल.” असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यात अनेक विकासकामे सुरू झाली.पाच वर्षांच्या त्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पांची मोठी प्रगतीही झाली. मीही त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आपल्याला पुढे न्यायचा आहे, असं मला देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. पण तेव्हा अनेकांनी विरोध केला,अडथळे आणले, असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. देवेंद्र फडणवीसांकडे प्रचंड इच्छाशक्ती होती आणि मी त्याप्रमाणे काम केलं. या प्रकल्पाचा मोठा फायदा विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण भागांना होणार आहे.” असंही शिंदेंनी नमूद केलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in