CM एकनाथ शिंदे सिद्धिविनायकाच्या चरणी; प्रसाद लाड यांची नवसपूर्ती

CM Eknath Shinde | Shivsena | Prasad Lad : आपला कार्यभार स्विकारल्यानंतरही त्यांनी दालनामध्ये पूजा केली होती.
CM Eknath Shinde | Shivsena | Prasad Lad
CM Eknath Shinde | Shivsena | Prasad LadSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आज मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या श्री. सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक झाले. तसेच लाड यांनी बोललेला नवस देखील पूर्ण केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना-भाजप तसेच सहयोगी पक्षांचे युती सरकार सत्तेत आल्यास श्री. सिद्धिविनायकाच्या चरणी महायज्ञ करण्याचा संकल्प लाड यांनी सोडला होता. (CM Eknath Shinde at Siddhivinayak Temple)

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यारुपाने पुन्हा एकदा शिवसेना-भाजप आणि अन्य सहयोगी पक्षांचे सरकार सत्तेत आले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे यांनी गणेश पूजेस उपस्थित राहून श्री.गजाननाचे भक्तीभावाने दर्शन घेतले व महायज्ञाचेही मनोभावे पूजन करून आपल्यावरील जबाबदारी सार्थ ठरावी यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचा संकल्प केला.

याप्रसंगी आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश अबिटकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रसाद लाड आणि त्यांचे सर्व कुटूंबीय, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर असे सर्व नेते देखील उपस्थित होते. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांचे धार्मिक रुप यापूर्वीही अनेकदा पाहिलं आहे. आपला कार्यभार स्विकारल्यानंतरही त्यांनी दालनामध्ये पूजा केली होती. त्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली होती.

शिंदे गटाला वाढता पाठिंबा :

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा वाढत असून ४० आमदारांपाठोपाठ अनेक माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, नाशिक अशा महापालिकांमधील नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्यांची संख्या मोठी असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com