Eknath Shinde : शिंदे-फडणवीस सरकारचा असाही मोठा विक्रम, निर्णयांचा धडाका

पर्यावरण विभागाकडून केवळ 2 निर्णय घेण्यात आले, कारण हा विभाग आधी आदित्य ठाकरे यांच्याकडे होता, ज्यांनी या कमी महत्त्वाच्या विभागाला ग्लॅमर आणले होते.
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political Crisis in Maharashtra sarkarnama

मुंबई : राज्यात सत्तातर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. या शिंदे सरकारला (CM Eknath Shinde) महिना पूर्ण झाला आहे. राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. पण या महिनाभरात सरकारनं ७४९ ठराव मंजूर करण्याचा विक्रम केला आहे. यात आरोग्यविभागासाठीचे सर्वाधिक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. दररोज सरासरी 25 शासकीय ठराव मंजूर करण्यात आले आहेत. (Eknath Shinde news update)

विभागाला मंत्री नसल्याने विभागाचे धोरणात्मक निर्णय होत नाहीत. मात्र नियमीत प्रशासकीय काम मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच पाहायला मिळत आहे. एवढच नाही तर फडणवीस आणि ठाकरे सरकारपेक्षा जास्त शासन निर्णय या सरकारने घेतले असल्याचे दिसते.

या 749 सरकारी ठरावांपैकी, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विक्रमी ९१ जीआर तर पर्यावरण विभागाकडून केवळ 2 जीआर काढण्यात आले आहे. मात्र, विरोधकांकडून वारंवार मागणी करूनही सरकारने राज्यातील विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित शेतकरी आणि लोकांसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या मदत पॅकेजचा सरकारी ठराव मंजूर अद्याप करण्यात आलेला नाही.

तीस जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. या दोन सदस्यीय सरकारने आतापर्यंत 749 शासकीय ठराव मंजूर करण्याचा विक्रम केला आहे.आतापर्यंतची ही घटना असामान्य आणि विक्रमी आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि जबाबदाऱ्यांचे वाटप झालेले नाही, तरीही इतके ठराव मंजूर झाल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

आवश्यक फाइल्सवर स्वाक्षरी करण्याचे सर्व अधिकार सध्या फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेआहेत. शिंदे सरकारने घेतलेले निर्णय पूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाचे आहेत. यात समित्यांची स्थापना, प्रतिनियुक्तीची पदे भरणे, औषधांची खरेदी अशांचा समावेश आहे.

Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political Crisis in Maharashtra
Sanjay Raut यांच्यावर ईडीचा मोठा आरोप : प्रवीण राऊत यांच्याच पैशावर परदेश दौरे

राज्य सरकारने 63 शासकीय ठराव प्रसिद्ध केले, त्यापैकी 14 सामान्य प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग (7), शालेय शिक्षण आणि क्रीडा (6), जलस्रोत (5) मृद व जलसंधारण (6), महसूल आणि वन (5), आणि ग्रामीण विकास (4) यांचा समावेश आहे.

पर्यावरण विभागाकडून केवळ 2 निर्णय घेण्यात आले, कारण हा विभाग आधी आदित्य ठाकरे यांच्याकडे होता, ज्यांनी या कमी महत्त्वाच्या विभागाला ग्लॅमर आणले होते. 12 जुलै रोजी एकाच दिवशी एकूण 70 शासकीय ठराव जारी करण्यात आले, त्यापैकी 36 ठराव पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे होते, जो विभाग शिंदे छावणीत सामील झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता.

आतापर्यंत विभागनिहाय मंजूर केलेले निर्णय

पाणीपुरवठा आणि स्वच्छता (83)

शालेय शिक्षण आणि क्रीडा (50)

महसूल आणि वन (44)

जलसंपदा (41)

कृषी (35)

आदिवासी विकास (29)

ग्रामीण विकास (28)

गृह (27)

वैद्यकीय शिक्षण (24)

मृद व जलसंधारण (24)

कौशल्य विकास (19)

शहरी विकास (19)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com