CM शिंदे - DCM फडणवीस दोन दिवस दिल्लीत तळ ठोकणार! अंतिम यादी घेऊनच परतणार?

Eknath Shinde | Devendra Fadnavis | शिवसेना- शिंदे गटातील पुढील न्यायालयीन लढाईची दिशा आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची आशा
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन दिवसातच पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी मात्र ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सोबत घेवून जाणार आहेत. येत्या शनिवारी आणि रविवारी हे दोघे दिल्लीत असणार आहेत. या दौऱ्यात शिंदे, फडणवीस हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेना- शिंदे गटातील पुढील न्यायालयीन लढाईची दिशा आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची आशा आहे. (Devendra Fadnavis | Eknath Shinde | Latest News)

राज्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपचे (BJP) कोणतेही वरिष्ठ नेत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर स्पष्टपणे बोलत नाहीत. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांत अस्वस्था असल्याची सांगण्यात येत आहे. याच अस्वस्थतेवर या दौऱ्यात काय तोडगा निघतो आणि मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमितच्या कार्यक्रमासह निती आयोगाच्या बैठकीसाठी फडणवीस दिल्लीत जात असल्याचे पक्षातर्फे कळविले आहे.

देवेंद्र फडणवीस हे काल (गुरुवार) दुपारी अचानक दिल्लीला गेले होते. त्यानंतर आज (शुक्रवार) दुपारी लगेचच त्यांचा पुढील दोन दिवसांचा दिल्ली दौरा जाहीर झाला. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याही दिल्ली दौऱ्याबाबत सांगण्यात आले. हे दोघेजण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह कायदेतज्ज्ञांची भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे.

शिवसेना आणि बंडखोर आमदारांमधील याचिकांवरील सुनावणी लांबणी पडण्यासोबत निडणूक आयोगालाही सर्वोच्च न्यायालयाने आदेश धाडल्याने संभाव्य विस्तार पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर मात्र, आता लवकरच विस्तार होईल, असे सांगून सरकारमधील नेतेही आता वेळ मारून नेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in