मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातून घेतला राज्याचा आढावा : VC द्वारे कॅबिनेटला उपस्थिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया झाल्याने अद्याप रुग्णालयात
मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातून घेतला राज्याचा आढावा : VC द्वारे कॅबिनेटला उपस्थिती
CM in cabinetSarkarnama

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिथीगृह येथे आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच .एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या. ते म्हणाले की, या आजारपणात आपण सर्व जण सहकार्य करीत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली फिजीओथेरपी व्यवस्थित सुरू आहे, असेही ते म्हणाले.

CM in cabinet
माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसचे बारा आमदार फुटले अन् मास्टरमाईंड प्रशांत किशोर!

यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत कोविड परिस्थिती, लसीकरण, पीक पाणी परिस्थिती आदी विषयांवर चर्चा झाली. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी संपासंदर्भात राज्य शासनाने उचललेल्या पावलांची माहिती मंत्रीमंडळास दिली. 

कोविड परिस्थिती युरोपमध्ये बिकट होत असून आपण देखील महाराष्ट्रात पुरेशी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे, कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच चाचण्या वाढवाव्यात. कोविडचा धोका पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे आरोग्याचे नियम पाळण्यासाठी सर्वानी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत यावर चर्चा झाली.

CM in cabinet
छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार!

अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी ठाकरे यांच्याकडून चौकशी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली तसेच लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुख्यमंत्री सद्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in