वसई-विरार महापालिका निवडणूकीचा मार्ग मोकळा

मुंबईतून (Mumbai) महापालिकेच्या प्रभाग रचनेची मांडणी करण्यात आली आहे.
Vasai Virar Municipal Corporation
Vasai Virar Municipal Corporation

संदीप पंडित

विरार : गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या (Vasai Virar Municipal Corporation) निवडणुकीचा (Election) मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी प्रभाग रचना मंगळवारी (१ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी प्रभाग रचनेचे स्वागत केले असले तरी त्यातील त्रुटींकडेही लक्ष वेधले. (Vasai Virar Municipal Corporation)

यावेळी मुंबईतून (Mumbai) महापालिकेच्या प्रभाग रचनेची मांडणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातून वसई विरार, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेसाठी प्रभागरचनेची मांडणी करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. मात्र असे असले तरी आता पर्यंतचे सत्ताधारी बविआने प्रभाग रचना कशीही झाली तरी आम्हाला फरक पडत नसल्याचे म्हटले आहे. तर महापालिकेत अवघा एक नगरसेवक असलेल्या भाजपला सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. तर काँग्रेस, शिवसेनेने रखडलेल्या निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Vasai Virar Municipal Corporation
तुमच्या कृतीतून खुशामतखोरीचा संदेश जातो, तलावाला दिलेले माझे नाव काढा

भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी प्रभागरचनेवर भाष्य केलं आहे. वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना नियमानुसार झाली नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांकडून येत आहेत. त्यावर आम्ही अभ्यास करत आहोत. तसेच, प्रभाग रचना कशीही झाली तरी यावेळी पालिकेवर भाजपचा झेंडाच फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

तर मी वसईकर अभियानाचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनीही प्रभाग रचना समाधानकारक झाली नसल्याचे म्हटले आहे. प्रभागरचनेत बऱ्याच त्रुटी आहेत. बऱ्याच ठिकाणी नियमाप्रमाणे प्रभाग रचना झालेली नाही. परंतु यावेळी पहिल्यांदा ग्रामीण भागात समाधानकारक प्रभाग रचना झाल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षा पासून सत्ताधारी नसल्याने यावेळी झालेली प्रभाग रचना त्यातल्या त्यात समाधानकारक आहे.

Vasai Virar Municipal Corporation
अकोल्यातील पोलीस कस्टडीत लैंगिक छळ प्रकरणी सहा पोलीस निलंबित…

प्रभाग रचना करण्यासाठी विरोधातील नेत्यांनी आपली बुद्धी वापरल्याचे रचनेवरून दिसून येत असले तरी त्याचा फटका आम्हाला बसणार नाही. प्रभाग रचना कशी हि केली तरी सत्तेवर पुन्हा बहुजन विकास आघाडीचं येणार, असल्याचा विश्वास बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता अजीव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

प्रभाग रचना करताना प्रशासनाने एकसंध पणा साधला नसल्याचे दिसून येत आहे. पूर पटतील प्रभागाच्या सीमा खूप मोठ्या झाल्याने तेथील विकासाला त्याचा फटका बसणार आहे,. परंतु त्याच वेळी पश्चिम पट्ट्यात मात्र एकसंधता आणल्याने येथील विकासाला चालना मिळणार आहे. ते प्राथमिकरीत्या बोलता येईल आमी अजून यावर आता अभ्यास करणार आहोत त्यानंतर त्यावर हरकती घेणार आहोत. असे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील अल्मेडा यांनी म्हटले आहे.

तसेच, गेल्या २ वर्षा पासून बघत होतो. अख्तर त्या निवडणुकीसाठीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्याचे स्वागत आहे. आमचे शिवसैनिक सतत कार्यरत असल्याने आम्ही कशीही प्रभाग रचना झाली तरी निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेना तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com