Bacchu Kadu: ठाकरे सरकार कोसळलं अन् बच्चू कडूंना रस्ते घोटाळ्यात मिळाली क्लिन चिट!

न्यायालयाच्या आदेशानंतर कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Minister Bacchu Kadu Latest Marathi News, Maharashtra Political News
Minister Bacchu Kadu Latest Marathi News, Maharashtra Political NewsSarkarnama

अकोला : रस्त्यांच्या कामातील अपहारप्रकरणी अकोला (Akola) जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांना पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे. ठाकरे सरकारविरोधात बंड केल्यानंतर नवव्या दिवशी कडू यांना गैरव्यवहाराच्या आरोपांतून पोलिसांनी मुक्त केलं आहे. एकीकडे ठाकरे सरकार कोसळत असताना दुसरीकडे कडूंच्या गैरव्यवहाराची फाईल क्लिअर झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Bacchu Kadu Latest Marathi News)

बच्चू कडू यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कागदोपत्री अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे (Vanchit Bahujan Aghadi) देण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने कारवाईचा आदेश दिला होता. दरम्यान, बच्चू कडू यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.(Maharashtra Political News)

Minister Bacchu Kadu Latest Marathi News, Maharashtra Political News
मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत अजितदादा संतापले

काय आहे प्रकरण?

जिल्हा नियोजन समितीने वार्षिक आराखडा तयार करताना जिल्हा परिषदेकडून ग्रामीण रस्ते दुरुस्ती, नवी कामे, पुलासाठी प्रस्ताव मागितले होते. त्यानुसार १० मार्च २०२१ रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव समितीकडे पाठवण्यात आला होता. मात्र जि.प.च्या या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल केले.

शासनाच्या लेखी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर समितीचे अध्यक्ष या नात्याने बच्चू कडू यांनी यंत्रणांचा गैरवापर करून निधी वळवला. शासनाच्या एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार करण्याच्या उद्देशाने बोगस कागदपत्र तयार केले, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता.

Minister Bacchu Kadu Latest Marathi News, Maharashtra Political News
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा; अडीच वर्षांनंतर 'मविआ' सरकार पायउतार

याप्रकरणी ता. ३ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवारी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हे दाखल न केल्याने वंचिततर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १५६ (तीन) अंतर्गत प्रकरण न्यायालयात दाखल केले होते. त्यावर न्यायालयाने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com