जितेंद्र नवलानीला शिंदे सरकारकडून क्लिन चिट; खंडणी प्रकरणाची चौकशी पोलिसांनी गुंडाळली

संजय राऊत यांनी याप्रकरणात किरीट सोमय्यांवरही गंभीर आरोप केले होते.
Jitendra Navlani Latest News, Sanjay Raut Latest Marathi News
Jitendra Navlani Latest News, Sanjay Raut Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : व्यावसायिक व विकसकांकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल केल्याचे आरोप असलेल्या जितेंद्र नवलानीला मुंबई पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवलानीवर अनेक गंभीर आरोप केले होते. 'एसआयटी'कडून या प्रकरणाची चौकशीही सुरू होती. पण शिंदे सरकारचा शपथविधी होताच आता पोलिसांनी या आरोपांत तथ्य नसल्याचे सांगत चौकशीच बंद केली आहे. (jitendra Navlani Latest News)

पोलिसांकडून मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याबाबत लेखी माहिती दिली आहे. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत नवलानीची प्राथमिक चौकशी रद्द करण्याची याचिका निकाली काढली. नवलानीकडून ईडीच्या काही अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल केल्याचा आरोपही राऊतांनी केला होता. तसेच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचाही त्याच्याशी संबंध असल्याचा दावा राऊतांनी केला होता.

Jitendra Navlani Latest News, Sanjay Raut Latest Marathi News
एकनाथ शिंदेंची नारायण पाटलांना साथ : `आदिनाथ` हस्तांतरणास शेवटच्या क्षणी ब्रेक!

शिवसेनेचे माजी नगरसेवक अरविंद भोसले यांच्या तक्रारीनंतर जितेंद्र नवलानी विरोधात मुंबई लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होता. 59 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करत हा गुन्हा सुरवातीला EOW कडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर ACB नेही गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाकरे सरकारने एसआयटीही नेमली होती.

एसआयटीकडून सुरू असलेली प्राथमिक चौकशी रद्द करण्यात यावी तसेच हे प्रकरण न्यायालयात असेपर्यंत पोलिसांनी आपल्याला अटक करू नये, अशी मागणी करणारी याचिका नवलानी याने उच्च न्यायालयात दाखल केली होती. सरकार बदलताच पोलिसांनी बुधवारी खंडणीच्या आरोपात तथ्य नसल्याचे लेखी निवेदन न्यायालयात सादर केले. त्यानंतर न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी नवलानीची याचिका निकाली काढली.

Jitendra Navlani Latest News, Sanjay Raut Latest Marathi News
मातोश्री आमचे मंदिर; तर एकनाथ शिंदे संकटमोचक : क्षीरसागरांनी साधला बॅलन्स!

राऊतांनी काय आरोप केले होते?

जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचा (ED) एजंट असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. नवलानी याच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंनीही ७ कोटी रुपये दिले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले होते.

भोसले यांच्यासह DHFL घोटाळ्यातही नवलानी याचा संबंध आहे. या कंपनीकडून नवलानी याच्या अकौंटवर 25 कोटी खात्यावर जमा, वाधनवान कडून दहा कोटी आणि अविनाश भोसलेंच्या कंपन्याकडून सात कोटी रुपये जमा झाला आहे, असे राऊत यांनी सांगितले होते. जीतेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कसे दिले जातात?, नवलानी आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा काय संबंध आहे हे मी लवकर सांगणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com