सिडको, एमएसआरडीसीकडून भू्स्खलनग्रस्तांना घरे बांधुन मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

पहिल्या टप्प्यात ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना जलदगतीने तात्पुरता निवारा देण्याचे काम कोयनेत झाले आहे. याच धर्तीवर कायम स्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात आपण आग्रही असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
सिडको, एमएसआरडीसीकडून भू्स्खलनग्रस्तांना घरे बांधुन मिळणार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
CIDCO, MSRDC to provide houses to landslide victims: Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai

कोयनानगर : मुसळधार पाऊसाने २२ जुलैला पाटण तालुक्यात झालेल्या भूसल्खनामध्ये मोठी हानी झाली आहे. यामध्ये कोयना विभागाचे भरुन न येणारे नुकसान झाले आहे. भूसल्ख्ननामध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपत्तीग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी शासन सकारात्मक असून आपत्तीग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित झाल्यावर त्या ठिकाणी आपत्तीग्रस्तांना सिडको व एमएसआरडीसी च्या माध्यमातून नवीन घरे बांधुन देण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. CIDCO, MSRDC to provide houses to landslide victims: Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai

मिरगाव येथे भूस्खलनामध्ये पूर्णपणे गाडलेल्या आपद्ग्रस्त बाकाडे कुटुंबियांशी कोयना प्रकल्पाच्या वसाहती देण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासस्थानी बसवलेल्या गणपतीचे दर्शन घेवुन आपत्तीग्रस्त श्री. बाकाडे यांच्याशी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चर्चा केली. यावेळी नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, अशोकराव पाटील, सरपंच शैलेंद्र शेलार, विजय बाकाडे, धोंडीराम बाकाडे, संजय बाकाडे, उत्तम बाकाडे व बाकाडे कुटुंबिय उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, भूस्खलनग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सुरक्षित जागा शोधण्याचे काम महसूल विभाग युध्द पातळीवर करत आहे.  पुनर्वसनासाठी खाजगी जागा खरेदी करून त्या ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याची तयारी शासनाने ठेवली आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. त्यांना जलदगतीने तात्पुरता निवारा देण्याचे काम कोयनेत झाले आहे. याच धर्तीवर कायम स्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात आपण आग्रही असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.