Chitra Wagh : आता आंदोलन करणारे कंगना, केतकी चितळे, स्वप्ना पाटकरच्या वेळी गप्प का होते?

Chitra Wagh : अब्दुल सत्तारांविरोधात प्रतिक्रीया उमटत असताना, चित्रा वाघांचा सवाल!
BJP leader Chitra Wagh
BJP leader Chitra WaghSarkarnama

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी अपशब्द काढले. यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले. सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. "कंगना, स्वप्ना पाटकर, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी ट्विट केले आहे. "मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन नाहीच पण महिलांचा अपमान झाल्यावर सोयीस्कर भूमिका कितपत योग्य? कंगना रणावत, स्वप्ना पाटकरच, केतकी चितळेबद्दल आवाज का उठला नाही? महिलांचा अपमान ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, त्यामुळे अशा वक्तव्याचे समर्थन नाहीच सगळ्यांनीच भान ठेवा, असे वाघ म्हणाले आहेत.

BJP leader Chitra Wagh
Congress : भारत जोडो यात्रेतून दुख:द बातमी, काँग्रेस नेत्याचा ह्रदयाच्या झटक्याने मृत्यू!

"महिलेचा आदर-सन्मान राखला गेलाच पाहिजे. महिलांनीही बोलताना तारतम्य जपायला पाहिजे. पुरुषांकडून तर महिलांचा सन्मानच केला पाहिजे. पण महिला आहे म्हणून मी काहीही बोलेन, असं नाही, आणि याला जर उत्तर आलं तर महिलांची अस्मिता दुखावली गेली, असं म्हणत असाल तर ते ही बरोबर नाही. दोघांकडूनही एकमेकांचा आदर-सन्मान राखला गेला पाहिजे. उत्तराला प्रत्युत्तर असतंच" असं चित्रा वाघ म्हणाल्या.

BJP leader Chitra Wagh
..म्हणून आम्ही संभाजीराजे अन्‌ उदयनराजे यांचे आभार मानले : ‘हर हर महादेव’च्या दिग्दर्शकांनी मांडली भूमिका!

"संजय राऊतांवर गुन्हा का दाखल केला नाही ?

"मागील अडीच वर्षांत तुम्हा काही केलं का नाही? संजय राऊतांच्या ऑडीओ क्लिपनंतर गुन्हे दाखल का करण्यात आला नाही. एका अभिनेत्रीला हरामखोर म्हटलं होतं, हे योग्य आहे का? स्वप्ना पाटकर ही महाराष्ट्राची मुलगी नव्हती का? त्यावेळी वेगळी भूमिका का घेतली नाही?" असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in