Chitra Wagh : “चित्राताई, आपल्या नवऱ्याचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारित झालं असतं.." ; आव्हाडाचं प्रत्युत्तर

Chitra Wagh : अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर आव्हाडांनी शेअर केले आहेत.
Chitra Wagh,jitendra awhad
Chitra Wagh,jitendra awhadsarkarnama

Chitra Wagh : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे, दोन्ही नेते आमनेसामने आले आहेत. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आव्हाडांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनंत करमुसे प्रकरणावरुन टि्वटवॅार सुरु झालं आहे.

जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर भाजपनं टीकास्र सोडलं आहे. चित्रा वाघ यांनी अनंत करमुसे प्रकरणाचा उल्लेख करत आव्हाडांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आव्हाडांनी स्पष्टीकरण देण्यासाटी एक टि्वट केलं आहे. या टि्वटची सध्या समाजमाध्यमांवर चर्चा आहे. अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर आव्हाडांनी शेअर केले आहेत.

आव्हाडांनी चित्रा वाघ यांना उद्देशून टि्वट केलं आहे. "ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्विटर फेसबूकचा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला. चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या. 2016 ते 2020 त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा,"असे आव्हाडांनी म्हटलं आहे.

Chitra Wagh,jitendra awhad
Mandakini Khadse : खडसेंना न्यायालयाचा दणका ; भाजप आमदाराला दिलासा

वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये आव्हाडांच्या विरोधात गुन्हाही दाखल झाला असून त्यांना अटकही झाली होती. गेल्याच महिन्यात करमुसेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून मारहाण प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशीची मागणी केलीय. त्यावर 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in