Sanjay Rathod : चित्रा वाघ म्हणतात; संजय राठोडांच्या ‘क्लिन चिट’चा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा

राठोड (Sanjay Rathod) यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करीत राठोडांना मंत्रीमंडळात घेण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले होते.
Chitra Wagh, Uddhav Thackeray
Chitra Wagh, Uddhav Thackeraysarkarnama

पुणे : राज्य मंत्रीमंडळात सहभागी करून घेतलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांना तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी ‘क्लिन चिट’ कोणत्या आधारावर दिली याचा खुलासा तत्कालिन ठाकरे सरकारने करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे.

Chitra Wagh, Uddhav Thackeray
Reservation : उपोषण सोडवायला आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी मराठा आरक्षणात लक्ष घालावे..

ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात गेल्यावर्षी राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांच्याशी संबंधित एका तरूणीचे पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येस राठोड जबाबदार आहेत, असा आरोप करीत चित्रा वाघ यांनी या विषयावरून राज्यभर राठोड यांच्याविरोधात वातावरत तयार केले होते. त्यावेळी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे वाघ यांच्या पाठीशी उभा राहिला होता.त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वनमंत्री असलेल्या राठोड यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर या साऱ्या प्रकरणाची चौकशी करून राठोड यांना ‘क्लिन चिट’ देण्यात आली.

Chitra Wagh, Uddhav Thackeray
मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ... अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

क्लिन चिट’ मिळताच मंत्रीमंडळात समावेश करावा या मागणीसाठी राठोड यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. दरम्यानच्या काळात शिवसेनेत फूट पडली. संजय राठोड यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.राज्यात सत्तापालट झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात राठोड यांचा नव्याने समावेश करण्यात आला. राठोड यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाला भाजपा तयार नव्हती. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या आग्रहामुळे राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश झाला.

राठोड यांच्या मंत्रीमंडळातील समावेशानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करीत राठोडांना मंत्रीमंडळात घेण्याचा निर्णय अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले होते.या पाश्‍र्वभूमीवर वाघ यांनी आज माध्यमांशी बोलताना राठोड यांचा विषय पुन्हा समोर आणला आहे. राठोड यांना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ‘क्लिन चिट’ देण्यात आली. त्यावेळी सरकारने काय चौकशी केली आणि ‘क्लिन चिट’ कशी दिली याचा खुलासा करावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com