Chitra Wagh, Rupali Chakankar News उर्फी निमित्त; चित्रा वाघ अन् भाजपचे टार्गेट रुपाली चाकणकरच...

Chitra Wagh, Rupali Chakankar News : चित्रा वाघ यांची रुपाली चाकणकर यांच्यावर टीका
Chitra wagh, Rupali chakankar News
Chitra wagh, Rupali chakankar News Sarkarnama

Chitra Wagh, Rupali Chakankar News : अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या तोकड्या कपड्यांवरून भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मात्र, यावेळी निशाणा साधताना त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यामुळे उर्फी निमित्त भाजप आणि चित्रा वाघ यांचे टार्गेट रुपाली चाकणकर असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

राज्यात सत्तांतर झाले असले तरी महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. त्यांनी अनेक भाजप नेत्यांना अडचणीत आण्याचेही काम केले आहे. त्यामुळे भाजपच्या निशाण्यावर आता चाकणकर असल्याची चर्चा आहे.

Chitra wagh, Rupali chakankar News
Sangram Thopte News : थोपटे आणि फडणवीसांच्या भेटीचे ‘हे’ आहे खरे कारण!

चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषदेत उर्फी जावेद आणि चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. वाघ म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नंगानाच चालू देणार नाही. तसेच महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेववरुनही वाघ यांनी चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त केला.

मुंबईत उर्फी जावेद उघडी-नागडी फिरत आहे, याची महिला आयोगाने सुमोटो केस चालवणे गरजेचे होते. मात्र, महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली नाही, हे दुर्दैवी. अश्लील, घाणेरडे, ओंगळवाणे व्हीडिओ समाजमाध्यमात व्हायरल होत असतांना त्याकडे दुर्लक्ष केले गेले, असा आरोप त्यांनी केला.

महिला आयोगाने फक्त ट्विटरवील एका पोस्टची दखल घेऊन अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवर आक्षेप घेतला होता, असेही त्यांनी सांगितले. तेजस्वीनी पंडित यांचे ते पोस्टर होते. या वेब सीरिजचे दिग्दर्शक संजय जाधव यांना यांना नोटीस पाठवल्याचे वाघ यांनी सांगितले. या पोस्टरमुळे धुम्रपान समर्थन आणि अंगप्रदर्शन, असा चुकीचा संदेश जात असल्याचे आयोगाने म्हटले होते.

मात्र, इथे उर्फी रस्त्यावर उघडी-नागडी फिरत असूनही महिला आयोग तिच्या नंगानाचची दखल घेणार नाही का, असा सवाल त्यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांचा संपूर्ण रोख हा चाकणकर यांच्यावकडेच होता. त्यामळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

Chitra wagh, Rupali chakankar News
Nana Patole News : नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट

उर्फीच्या कपड्यांवर चाकणकर काय म्हणाल्या होत्या?

चाकणकर यांनी कुणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल. मात्र, इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका चाकणकर यांनी माडली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in