"राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा, कोणत्या मस्तीत आहे हा?" : चित्रा वाघ संतापल्या

BJP | Chitra Wagh | NCP | Ashok Gawade : अमृता फडणवीसांबद्दलचं अक्षेपार्ह वक्तव्य अंगलट
Chitra Wagh Criticizes  Sanjay Raut
Chitra Wagh Criticizes Sanjay RautSarkarnama

वाशी : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता (Amruta Fadnavis) फडणवीस यांच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष (NCP) अशोक गावडे (Ashok Gawade) चांगलेच वादात सापडले आहे. काल भाजपच्या (BJP Manda Mhatre) आमदार मंत्रा म्हात्रे यांनी गावडे यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी अन्यथा तुम्हाला नवी मुंबईत महिला फिरू देणार नाहीत, अशा इशारा दिला आहे. त्यानंतर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) देखील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन आपला संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, "अशोक गावडेची जीभ छाटा. राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष, कुठल्या मस्तीतं आहे? अमृता फडणवीस यांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि यात कोणालाही महिलांचा अपमान, विनयभंग दिसत नाही का?" असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू होते. त्यावेळी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, यांची देखील भाषणे झाली. त्याचवेळी अशोक गावडे हे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली.

Chitra Wagh Criticizes  Sanjay Raut
भाजपचा निवडणूक धमाका : महापालिकेकडून पुणेकरांना २ हजार ५०० कोटींचे गिफ्ट

"आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते" असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com