Eknath Shinde News: सावित्रीबाई फुलेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स'वर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Maharashtra politics: महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही,
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Eknath Shinde News: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याने 'इंडिक टेल्स' या वेबसाईटविरोधात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी राज्यभरातून या वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली होती. आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Eknath Shinde News
Jejuri Trustee Dispute : जेजुरी मंदिर ट्रस्ट; नव्याने नेमलेल्या तीन विश्वस्तांवर गुन्हे दाखल असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

'इंडिक टेल्स' या वेबसाईटने सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे आढळून आल्यानंतर राज्यभरातील सामाजिक आणि राजकीय संस्थांनी याविरोधात राज्य सरकारकडे आक्षेप नोंदवले होते. या आक्षेपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदेंनी या वेबसाईटवरील सावित्रीबाई यांच्यासंदर्भात मजकूर तपासून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (Maharastra Politics)

महापुरुषांच्या संदर्भात लिखाण करताना ते अत्यंत अभ्यासपूर्ण असायला हवे. तसेच त्यातून त्यांचा अवमान होणार नाही याची दक्षता लेखक किंवा प्रकाशन संस्थेने घेणे गरजेचे आहे. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांची शासन गय करणार नाही, असा इशारा देतानाच 'इंडिक टेल्स' वरून लिहिण्यात आलेल्या लेखात काही आक्षेपार्ह बाबी असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Eknath Shinde News
Loksabha Election 2023: ...तर पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक होणार नाही

सावित्रीबाई फुले यांच्यासंदर्भात आढळून आलेल्या या आक्षेपार्ह मजकूराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसही आक्रमक झाली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आज मुंबईत आंदोलन केलं. तसेच राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचं शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेट घेतली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com