दादागिरी करून याल तर.... : उद्धव ठाकरेंचा राणा दांपत्यास इशारा

हनुमान चालिसा पठणाची तुमच्या घरात पद्धत नसेल, संस्कृती नसेल तर आमच्या घरात येऊन जरुर बोला. पण त्याला एक पद्धत असते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : हनुमान चालिसा वाचनासाठी आमच्या घरी यायचे असेल तर जरूर या. हनुमान चालिसा पठणाची तुमच्या घरात पद्धत नसेल, संस्कृती नसेल तर आमच्या घरात येऊन जरुर बोला. पण त्याला एक पद्धत असते. ‘साधू संत येती घरा; तोचि दिवाळी-दसरा,’ अशी एक म्हण आहे. पण, आमच्या घरात कायम साधू संत येत असतात. पण ते नीट बोलून सांगून येतात. त्यांचे स्वागत आम्ही करतो. पण, दादागिरी करून याल, तर दादागिरी कशी मोडायची, ते पण आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलेले आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राणा दांपत्यास लगावला. (Chief Minister Uddhav Thackeray warns Rana couple)

मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या ‘नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड’ एनसीएमसीचे लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray
राणेंनी केसरकरांपुढे उभे केले कडवे आव्हान; सावंतवाडीच्या लखमराजेंचा भाजपत प्रवेश

ते म्हणाले की, लवकरात लवकर एक जाहीर सभा घेण्याचा माझा इरादा आहे. तिकडे मला मास्क काढून बोलायचं आहे. सगळ्यांचा सोक्षमोक्ष मला एकदा लावूनच टाकायचा आहे. सध्या तकलादू हिंदुत्ववादी आले आहेत. नकली नवहिंदू त्यांचा समाचार घ्यायचा आहे. तेरी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे, हा त्यांचा पोटशूळ आहे. त्यांचा समाचार मला एकदा घ्यायचाच आहे.

Uddhav Thackeray
खार पोलिस ठाण्यात सोमय्यांच्या विरोधात घोषणा देणारे महाडेश्वर पोलिसांच्या जाळ्यात...

गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालिसा पठणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावरून झालेल्या गोंधळातून राणा दांपत्यास अटक करण्यात आली आहे. त्या संपूर्ण प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रथमच भाष्य केले. त्यावेळी त्यांनी राणा दांपत्यास नाव न घेता टोला लगावला.

Uddhav Thackeray
हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का : १५ वर्षांची सत्ता संपुष्टात; भरणे गटाची बाजी!

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी काम करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे. लोकांच्या आयुष्यातही ईझ ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com