मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया यशस्वी

वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टिमने साधारण पाऊण तास Cm Uddhav Thackeray यांच्यावर शस्त्रक्रिया केली.
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्यावर आज (१२ नोव्हेंबर) HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मानेच्या दुखण्यामुळे दोन दिवसांपुर्वी ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. वरिष्ठ ऑर्थो सर्जन (Ortho Surgeon) डॉक्टरांच्या टिमने साधारण पाऊण तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटर मध्येच आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील काही वेळ ते विश्रांती घेतील.

रुग्णालयात दाखल होण्यापुर्वीच मुख्यमंत्र्यांनी मानेच्या दुखण्यावर उपचार घेण्यासाठी आपण पुढील दोन-तीन दिवस रुग्णालयात भरती होणार असल्याची माहिती दिली होती. तसेच यावेळी त्यांनी आपल्या आजारपणाबद्दल माहिती देत जनतेला लसीकरणासाठी आवाहनही केलं होतं.

Cm Uddhav Thackeray
कंगनाचा पद्मश्री परत घ्या! राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रपतींकडे मागणी

'गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असताना दुसरीकडे आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणालो तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे लवकरच तब्येत बरी होईल, अशी खात्री आहे.

यानिमित्ताने एकच सांगायचं आहे. कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसीचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपले जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, एवढीच विनंती करतो.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com