ही तर `केमिकल लोच्या`ची केस : उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर शेलकी टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका
ही तर `केमिकल लोच्या`ची केस : उद्धव ठाकरेंची राज यांच्यावर शेलकी टीका
Raj Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर आजच्या सभेत जोरदार टीका केली. राज ठाकरे यांचे नाव न घेतला मुन्नभाई एमबीबीस चित्रपटाचे उदाहरण देत त्यांच्या डोक्यात `केमिकल लोच्या` झाल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेऊन टीका केली पण राज यांचे नाव घेणे टाळले.

मला एका शिवसैनिकाने (ShivSena) विचारले तुम्ही लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिलात का? मी म्हटले आता त्याचा संबंध काय? म्हणे त्याच्यात संजय दत्तला गांधीजी दिसतात, मग हा गांधीगिरी करतो. तशी एक केस आपल्याकडे आहे. मी म्हटले कोणती? म्हणे ती नाही का, ज्याला स्वत: बाळासाहेब झाल्यासारखे वाटते. हल्ली शाल घेऊन फिरतात. ते कधी मराठीच्या नादाला लागतात, कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. पिक्चरमधील मुन्नाभाई लोकांचे भले तरी करत असतो. हा कुठला मुन्नाभाई काढला? संजय दत्तला कळते की आपल्या भेज्यात केमिकल लोच्या झाला. ही केमिकल लोच्याची केस आहे. सध्या सुरू असलेला चित्रपटही सत्य घटनेवर आधारित आहे. असे मुन्नाभाई फिरत असतात, फिरू द्या. आता कुणाला अयोध्येला जायचे आहे. जाऊ द्या, असे उद्धव ठाकरे यांनी राज यांना सुनावले.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर झाले नतमस्तक... सभेची मने जिंकली

भाजपवर टीका करतांना उद्धव ठाकरे म्हणाले, सत्ता मिळत नाही म्हणून तुमचे एकतर्फी प्रेम चालले आहे. मग वाटते, हे कोणत्या दिशेने चालले? एकतर्फी प्रेमात प्रेयसीला विद्रूप करण्याचे प्रकार घडत असतात. तसे यांचे एकतर्फी प्रेम आहे. हे महाराष्ट्राला विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहेत. घशाची खाज खाजवायची कशी म्हणून हे बोलून मिटवतात. मात्र, आम्ही संयम बाळगतो म्हणजे आम्ही नामर्दाची औलाद नाही. एक तर आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. मात्र, अंगावर आले तर सोडत नाही हे आमचे हिंदुत्व आहे, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केले. तरी हृदयातले हिंदुत्व आम्ही सोडलेले नाही. मी विधानसभेतही बोललो आहे. सत्ता असो वा नसो, आम्हाला परवा नाही. आमचे हिंदुत्व हे तकलादू नाही, ते खरे आहे. हिंदुत्व सोडायला काय धोतर वाटले का, कधी नेसले, कधी सोडले, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
ठाकरेंनी फडणविसांना धुतले : तुमच्या वजनाने बाबरी मशीद पडली असती...

हिंदुत्व नेसण्याची, सोडण्याची गोष्ट नाही आहे. आम्ही काँग्रेससोबत गेलो ते उघड पणे गेलो. तुमच्यासारखा सकाळचा शपथविधी नाही केला. तुम्ही केले तर पवित्र, आम्ही केले तर अपवित्र. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो तर दगा, तुम्ही सकाळची शपथ घेतली त्याचे काय. तो तुमचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर नवाब मलिक, अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसून गुणगाण केले असते असे वाटते का, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.