Eknath Shinde News : "गरीबांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठेपणा दाखवावा"

Jitendra Awhad : ठाण्यातील १७० एकरातील क्लस्टर १० तुकड्यात राबविण्याची आव्हाडांची मागणी
Jitendra Awhad, Eknath shinde
Jitendra Awhad, Eknath shindeSarkarnama

Thane Cluster News : आता १७० एकरवर क्लस्टर करण्याचे धोरण आखलेले आहे. ते उभ्या आयुष्यात पूर्ण होणार नाही. क्लस्टरची योजना दहा तुकड्यात राबविली तर ती शंभर टक्के पूर्णत्वास जाईल. या क्लस्टबाबत सुरूवातीला आम्ही घेतलेल्या निर्णयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. त्यावेळेस दहा हजार चौरस मीटरच्या भूखंडावर क्लस्टर योजना राबवायची, असे ठरले होते. आता दोनशे एकरवर क्लस्टर राबविण्याचा निर्णय घेतला. गरीबांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांनी यात बदल करावा, असे आवाहन माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने सेंट लॉरेन्स हायस्कूल, डिसोझावाडी येथे दाखले वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आव्हाड म्हणाले, "सुमारे १७० एकरवर क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविणे अशक्यच आहे. त्यामुळे १७० चे दहा तुकडे करून ही योजना राबविण्यात यावी. आम्हाला गरिबांचे भले हवे. ते तुमच्या हाताने झाले तर आम्हाला हरकत असण्याचे कारण नाही. त्यामुळेच मनाचा थोडासा मोठेपणा दाखवून क्लस्टबाबत पुनर्विचार करावा. त्यातून आपसूक गरिबांचे भले होईल."

क्लस्टरच्या नावाखाली आता काहीजण स्वतःची घरे भरत असल्याचा आरोप आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. ते म्हणाले, क्लस्टरला आपणच राज्य शासनाकडून मान्यता मिळवून घेतली होती. सध्या मात्र क्लस्टरच्या नावाखाली काहीजण आपली घरे भरण्याचे काम करीत आहेत. ते अभिप्रेत नव्हते. छोट्या छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या, ज्यांची घरे धोकादायक आहेत त्यांना हक्काची आणि पक्की घरे मिळावित म्हणून आपण क्लस्टर आणले होते. तो उद्देश साध्य होताना आता दिसत नाही.

एवढ्या मोठ्या भूखंडावर योजना राबवण्याचा निर्णय घेतला तर चौथ्या पिढीतील लोकांना घरे मिळतील, अशी भीतीही आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, "ही महत्वाकांक्षी एसआरए योजना असून ती अधिक गतिमान आहे. आता आत्मप्रौढीमुळे या योजनेला स्थगिती देण्यात आली. झोपडीवासियांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात मन मोठे लागते. एवढ्या मोठ्या भूखंडावर योजना राबवायची ठरविले तर आज जी पिढी येथे राहतेय, त्यांच्या चौथ्या पिढीला पहिला फ्लॅट मिळेल. आताच्या पिढीला उभ्या आयुष्यात फ्लॅटमध्ये जाताच येणार नाही." (Thane SRA Scheme)

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com