Shivsena Bhavan : शिवसेना भवनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान; म्हणाले...

Eknath Shinde : ''...म्हणून आम्ही विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं''
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

प्राची कुलकर्णी :

Shivsena : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला. मात्र, शिवसेनेचा (Shivsena) ताबा शिंदेंकडे गेल्यानंतर आता शिवसेना भवनाचे काय होणार? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

याबाबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शिंदे म्हणाले, ''आपण कोणत्याही प्रॉपर्टीवर आणि कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत. कोणी काही बोलत असेल पण मी आत्ता स्पष्ट करतो की, आम्हाला त्यांच्या कोणत्याच प्रॉपर्टीबाबत मोह नाही'', असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde
Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना केलेल्या फोनबाबत पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या...

ते पुढे म्हणाले, ''निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवर झालाय. त्यामुळे आता त्यावर काही बोलणे चुकीचे आहे. आम्हीच शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं. पण आम्ही कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर दावा सांगणार नाही'', अशी आपली भूमीका त्यांनी स्पष्ट केली.

दरम्यान, शिवसेना भवनाचा शिंदे गट ताबा घेणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होता. मात्र, आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमीका स्पष्ट केली. त्यामुळे ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com