'वर्षा'च्या जागी 'नंदनवना'तच राहणे मुख्यमंत्री शिंदेंनी केले पसंत : बंगल्याला 10 फुट भिंतीचे कुंपण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचे आमदार व खासदार आपल्या गटात घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांत तीव्र नाराजी आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई - शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार आपल्या गटात घेतले आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिकांत तीव्र नाराजी आहे. शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यात रहायला न जाता. नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्याच्या सुरक्षेत आज वाढ करण्यासाठी सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले. ( Chief Minister Shinde prefers to live in 'Nandanavana' instead of 'Varsha': 10 feet high wall fence for bungalow )

Eknath Shinde
एकनाथ शिंदे विसरले पण श्रीकांत शिंदेंनी ठाकरेंचे पद लक्षात ठेवले...

नंदनवन बंगल्याला 10 फुट उंच भिंतीचे कुंपण करण्यात आले आहे. पूर्वीची सहा फुटाची भिंत सध्या तोडून नवी 10 फुटाची भिंत करण्यात येत आहे. सुरक्षेमुळे हे भिंतीचे कुंपण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खरे तर मुख्यमंत्री हे वर्षा बंगल्यावर रहायला जातात. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नंदनवन त्यांच्या शासकीय बंगल्यातच राहणे पसंत केले आहे. बंगल्यातील हलचाली रस्त्यावरून दिसू नयेत व बंगला सुरक्षितता असावी यासाठी भिंतीचे कुंपण वाढविण्यात येत आहे. हा बंगला रस्त्याच्या अगदी लगत आहे.

Eknath Shinde
नाशिकच्या बंडखोरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळ देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर रहायला जातील असे सांगितले जात होते. मात्र ते वर्षा बंगल्यावर रहायला न जाता. त्यांच्या नंदनवन या शासकीय बंगल्यातच राहणार आहेत. शासकीय बैठका मात्र वर्षा बंगल्यावर होणार आहेत, अशी माहिती समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in