मुख्यमंत्री शिंदे जोरात : विभागीय मुख्यमंत्री सचिवालयातच होणार ‘या’ कामांचा निपटारा !

Divisional Commissioner Office : विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे.
Mantralay
Mantralaysarkarnama

मुंबई : ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या कामासाठी मुंबईतील मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विभागीय महसूल आयुक्तांच्या कार्यालयात सुरू करण्यात आलेली विभागीय मुख्यमंत्री सचिवालये अधिक सक्षम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

Mantralay
पंढरपुरातील विठ्ठल मंदिर सरकारपासून मुक्त होणार? डॉ. सुब्रमण्यम स्वामींची मोठी घोषणा

नागरीकांना त्यांच्या कोणताही कामासाठी मुंबईत मंत्रालयातपर्यंत येण्याची गरज पडू नये, स्थानिक पातळीवरच त्यांचा प्रश्न निकाली निघावा. सामान्यांना लोकाभिमुख, पारदर्शक प्रशासन अनुभवता यावे म्हणून ही कार्यालये अधिक सक्षम करण्यात येणार आहेत. नागरिकांनीदेखील आपल्या तक्रारी, निवेदने, अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

Mantralay
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात अजितदादांचा 'जलवा'

नागरिकांची शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, आदी मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयात स्विकारुन त्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधीत क्षेत्रीयस्तरावर कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. मात्र, यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पार्दशकता, गतिमानता आणतानाच सर्वसामान्य जनतेला कमी त्रास व्हावा या हेतूने कोकण, अमरावती, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये मुख्यमंत्री सचिवालयाचे क्षेत्रीय कार्यालय (सीएमओ) यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयांमधील महसुल उपायुक्त यांना विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी घोषित करण्यात आले आहे. ते याबाबत कामकाज पाहात असून विभागीय कक्षांमध्ये अर्ज स्विकारणे, पोच पावती देणे, अर्जावर कार्यवाही करणे तसेच प्राप्त अर्ज, त्यावरील कार्यवाही केलेले अर्ज व प्रलंबीत अर्ज या बाबतचा मासिक अहवाल मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवितात. मंत्रालयातील मुख्यमंत्री सचिवालयाचे या विभागीय स्तरावरील मुख्यमंत्री कार्यालयावर नियंत्रण केले जात आहे.

माहिती अधिकाराअन्वये प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जावर प्रशासकीय विलंब टाळण्याच्या दृष्टीने व तातडीने कार्यवाही होण्यासाठी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांमधील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जन माहिती अधिकारी, सहायक जन माहिती अधिकारी व अपिलीय प्राधिकारी यांना पदनिर्देशित करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in