मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की मुंबईचे : अतुल भातखळकरांचा प्रश्‍न
अतुल भातखळकर सरकारनामा

मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की मुंबईचे : अतुल भातखळकरांचा प्रश्‍न

देशातील कोरोना स्थितीची आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली होती.

मुंबई : प्रकृतीच्या कारणामुळे देशाच्या पंतप्रधानांनी बोलाविलेल्या महत्वाच्या बैठकीला गुरूवारी दांडी मारणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महापालिकेच्या बैठकीला उपस्थित राहतात याबाबत आश्‍यर्य व्यक्त करून हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत की मुंबईचे असा प्रश्‍न भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केला आहे.

अतुल भातखळकर
मुख्यमंत्री सक्रिय तरीही चंद्रकांत पाटील असं का बोलताहेत; जयंत पाटलांचा प्रश्‍न

देशातील कोरोना स्थितीची आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली होती.प्रकृतीचे कारण देत या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गैरहजर राहिले. राज्याच्यावतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीला हजेरी लावली.मात्र, या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या बैठकीला हजेरी लावत कोरोना स्थितीची आढावा घेतला.

अतुल भातखळकर
'नीट रहा नाहीतर ठोकून काढेन'; भाजप आमदाराचा बॅंक व्यवस्थापकाला दम...

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या उपस्थितीवरून भाजपाकडून ठाकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी बोलावलेली बैठक राज्याच्या दृष्टीने महत्वाची होती. राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला असताना या बैठकीला मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी उपस्थित राहणे अपेक्षत होते. मात्र, प्रकृतीचे कारण देत ही बैठक मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचा अप्रत्यक्ष आरोप भाजपाने केला आहे.

या संदर्भात बोलताना भाजपाचे आमदार भातखळकर म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेच्या सुमारे ८० हजार कोटी रूपयांच्या ठेवी आहेत. मात्र, महापालिकेने कोरोनाच्या गेल्या दोन वर्षांच्या काळात मुंबईकरांना एक दमडीचीही मदत केलेली नाही. हजारो कोटींच्या ठेवी असताना कसलीही मदत न करता केवळ बैठका घेऊन काय होणार.’’

राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे.रोज हजारो रूग्ण वाढत आहेत. या परिस्थितीत राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठाकरे चोखपणे आपली जबाबदारी बजावताना दिसत नाहीत,याकडे गेल्या काही दिवसांपासून भाजापाकडून लक्ष वेधण्यात येत आहे.या पाश्‍र्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांच्या बैठकीला अनुपस्थिती व मुंबई महापालिकेच्या बैठकीला उपस्थिती या विषयावरून भाजपाकडून आरोप करण्यात येत आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.