मुख्यमंत्री शिंदेंनी जयंत पाटलांना काढला चिमटा; तुम्ही तर विरोधी पक्षनेता...

अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांना टोले लगावले.
Jayant Patil-Cm Eknath Shinde News Mumbai
Jayant Patil-Cm Eknath Shinde News MumbaiSarkarnama

मुंबई : अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांना टोले लगावले. शिंदे यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत, टीकेलाही प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवरही शिंदे यांनी जोरदार उत्तर देत टोला लगावला.

जयंत पाटील यांनी बुधवारी सभागृहात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासंबधी केलेल्या विधानाचा संदर्भ देत शिंदेंना टोला लगावला होता. मनावर दगड ठेवून शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे, असे पाटील पक्षाच्या बैठकीत म्हणाले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले होते, भाजपने मनावर दगड ठेवून आमच्या शिंदे यांना मुख्यमंत्री केले असेल तर कुठलीही भानगड न ठेवता आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची संधी देऊ.

Jayant Patil-Cm Eknath Shinde News Mumbai
अजितदादा, त्यावेळी तुम्ही जरा घाईच केली : मुख्यमंत्र्यांचा टोमणा

तुमच्यातील गुण पाहता तसे करण्यास कोणीही नकार देणार नाही, असे मिश्किल भाष्य जयंत पाटील यांनी केले होते. हे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. सत्तासंघर्षाचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. आपण मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी आमची अपेक्षा आहे. तुम्ही तसे करत असाल. मात्र, बरेच निर्णय फडणवीसांना माहिती नसतात. हे सत्य असेल तर तुम्ही तुमचा कणखरपणा दाखवत आहात, असा टोला जयंत पाटील यांनी शिंदे यांना लगावला होता.

Jayant Patil-Cm Eknath Shinde News Mumbai
Aditya Thackeray | शेवटच्या दिवशीही शिवसेना भाजपा वाद थांबेना

दरम्यान, गुरुवारी सभागृहात बोलताना शिंदे यांनी जयंत पाटील यांच्या ऑफरवर उत्तर देताना, तुम्ही दादांना विचारले का? असा जोरदार टोला लगावला. तुम्ही अजित दादांना विचारले का? विरोधी पक्षनेता तुम्हाला व्हायचे होते, ते तरी तुम्ही झाले का, असा सवाल शिंदे यांनी केला. कालच्या भाषणातून ते दिसत होते, असे शिंदे म्हणाले. दादांची दादागिरी नेहमी चालणार असेही शिंदे म्हणाले. हलके फुलके वातावरण करताना तुम्ही बोचेल असे बोलत होतात, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com