Eknath Shinde On Savarkar Controversy : राहुल गांधींच्या थोबाडीत देण्याची हिंमत आहे का?; सावरकरांच्या मुद्द्यावरून शिंदेंचा ठाकरेंना सवाल

Devendra Fadnavis : ''वीर सावरकर गौरव यात्रा राज्यभरात काढली जाणार''
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

रविवारी मालेगावच्या सभेत बेलताना उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे, सावकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला होता. याच मुद्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना थेट सवाल केले आहेत.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Human-leopard conflict: मानव-बिबट्या संघर्षावर १५ आमदारांची नवी समिती तोडगा काढणार का?

एकनाथ शिंदे म्हणाले, ''स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान राहुल गांधी करत आहेत. ते सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करत आहेत. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आम्ही राज्यभरात 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' काढणार आहोत''.

''स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. सावरकर होते त्या अंदमानच्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस राहून यावं, मग त्यांना कळेल की त्याग काय असतो'', असं ते म्हणाले.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Shiv Sena :..नाहीतर तोच कांदा हाणून मारीन ; गुलाबराव पाटील राऊतांवर भडकले, 'आधी मत परत..

''राहुल गांधी वारंवार सांगतात की मी सावरकर नाही, मी गांधी आहे. पण सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. तुम्ही देशाच्या लोकशाहीबद्दल परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, याचा आम्ही निषेध करतो'', असं ते म्हणाले.

''काही लोकं हिंदुत्व-हिंदुत्व म्हणतात. मात्र, राहुल गांधी जे सावरकरांबाबत बोलतात. त्यावर ते काहीच बोलत नाहीत. कालच्या सभेत ते म्हणाले की सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, पण त्यांनी हे सांगावं की मग तुम्ही काय करणार आहात? राहुल गांधीच्या थोबाडीत देण्याची हिंमत तुमच्यात आहे का?'', असा सवाल नाव न घेता उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी केला.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Dharashiv Loksabha News : महाविकास आघाडीमुळे धाराशीवमध्ये ओमराजेंचे पारडे जड..

''राहुल गांधी सावकरांचा वारंवार अपमान करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मनीशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती. ती हिंमत उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आहे का?'', असा सवालही त्यांनी केला.

''काही दिवसांपुर्वी झालेल्या अधिवेशनात हिंदुत्ववादी नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात एकही शब्द काढला नाही. मात्र, राहुल गांधींची कायद्याने खासदारकी रद्द झाली, तर त्याचा बचाव करायला काळ्या फिती लावून काँग्रेस सोबत आंदोलन करताना आपण हे नेते पाहिले'', असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com