मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्याला पत्र...!

शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून प्रथमच शिवसेना नेत्यांशी संपर्क साधला आहे, तोही पत्राद्वारे
Eknath Shinde-Sunil Prabhu
Eknath Shinde-Sunil PrabhuSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेचे (Shivsena) वरिष्ठ आमदार आणि विधीमंडळाचे पक्षप्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांना पत्र पाठवले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानाचे निमंत्रण या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून प्रथमच शिवसेना नेत्यांशी संपर्क साधला आहे, तोही पत्राद्वारे. (Chief Minister Eknath Shinde's letter to Shiv Sena Pratod Sunil Prabhu)

Eknath Shinde-Sunil Prabhu
चहा पिण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला रस्त्यालगतच्या हॉटेलवर!

एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. तेव्हापासून बंडखोर आमदार आणि शिवसेनेमधून विस्तवही जात नाही. हे दोन्ही गट गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर अक्षरशः तुटून पडत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. मात्र, ती कटूता बाजूला ठेवून मुख्यमंत्री म्हणून बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पत्राद्वारे शिवसेना नेत्याशी संवाद साधला आहे. त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रतोद प्रभू यांना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथिगृहावर आयोजित चहापानाचे निमंत्रण दिले आहे. प्रभू हे पक्षप्रतोद असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा उल्लेख ‘विधानसभा सदस्य’ एवढाच केला आहे.

Eknath Shinde-Sunil Prabhu
जम्मू काश्मीरमध्ये जवानांची बस नदीत कोसळली; सहा जवान शहीद

पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विधान मंडळाचे सन २०२२ चे (पावसाळी) अधिवेशन बुधवारपासून (ता. १७ ऑगस्ट) मुंबई येथे सुरू होत आहे. महाराष्ट्र विधानमंडळास एक गौरवशाली परंपरा लाभली आहे. या परंपरेनुसार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याबरोबर अनौपचारिक, मनमोकळी आणि सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी, या हेतूने आपणांस अगत्यपूर्वक या कार्यक्रमासाठी निमंत्रित करत आहे.

Eknath Shinde-Sunil Prabhu
‘विनायक मेटेंच्या गाडीचा ३ ऑगस्टलाही दोन गाड्यांनी पाठलाग केला होता’ : मृत्यूचं गूढ वाढलं

पावसाळी अधिवेशन उद्यापासून (ता. १७ ऑगस्ट) सुरू होत आहे. कोणत्याही अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांसह सत्ताधारी आमदारांसाठी सरकारकडून चहापानाचे आयोजन केले जाते. अधिवेशन सुरळीतपणे चालावे, यासाठी काही चर्चाही यावेळी होत असते. मात्र, बहुतांश वेळा विरोधक सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कारास्त्र उगारतात. मात्र, परंपरेप्रमाणे या चहापानाचे आयोजन करण्यात येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com