Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; राजभवन हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर निघाले होते.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : सातारा-पाटण दौऱ्यावर निघालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शिंदे यांचे हेलिकॉप्टरचे तातडीने राजभवनाच्या हेलिपॅडवर इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये शिंदे यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत आणि रोहयो मंत्री संदीपान भूमरे हेही होते. (Chief Minister Eknath Shinde's helicopter malfunctioned)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याच्या दौऱ्यावर निघाले होते. मुख्यमंत्री यांचे गावही सातारा जिल्ह्यात आहे. त्याचवेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यांचसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि रोहयो मंत्री संदीपान भूमरे होते. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टरत राजभवनाच्या हेलिपॅडवर तातडीने लॅडिंग करण्यात आले.

Eknath Shinde
Karnataka Election Result : निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील आघाडीवर

दरम्यान, मुख्यमंत्री आपला पाटणचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासाठी दुसऱ्या हेलिकॉप्टरची सोय करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. हेलिकॉप्टरच्या एसीमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर राजभवनच्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले आहे.

Eknath Shinde
Karnataka Election Result : भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले जगदीश शेट्टार पिछाडीवर, तर लक्ष्मण सावदी आघाडीवर; भाजपचा बडा नेताही पिछाडीवर

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जात आहे. याअगोदरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुलढाण्याला जात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. मुख्यमंत्री शिंदे तेव्हा हेलिकॉप्टरमध्ये नव्हते. मात्र, आज ते हेलिकॉप्टरमध्ये असतानाच या बिघाडाची घटना घडली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com