ठाणे शहरासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

ठाण्याबाबत आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मंजूर केली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

ठाणे - ठाणे महापालिकेला मुंबई महापालिकेकडून प्रक्रिया केलेले अतिरिक्त 20 दशलक्षलीटर शुद्ध पाणी प्रतिदिन पाणी उपलब्ध करून द्यावे अशी अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मंजूर केली. यामुळे ठाणे शहरातील वागळे इस्टेट परिसरातील कोपरी, आनंदनगर, किसननगर, भटवाडी व दिवा परिसरातील नागरिकांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. Thane Municipal News Update

मंत्रालयात झालेल्या बैठकीस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा व इतर अधिकारी आज उपस्थित होते.

Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लवकरच जळगाव महापालिकेत धमाका?

आज झालेल्या बैठकीत वागळे इस्टेट विभाग- 11 द.ल.ली. प्रतिदिन, कोपरी आनंद नगर विभाग 6 द.ल.ली. प्रतिदिन, किसननगर 2 द.ल.ली. प्रतिदिन, भटवाडी 1 द.ल.ली. प्रतिदिन असा एकूण 20 एम एलडी अतिरिक्त शुद्ध पाण्याचा व दिवा परिसराला 6.50 द.ल.ली. प्रतिदिन पाणी पुरवठा करणेस मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

Eknath Shinde
ठाकरेंची कारवाई शिंदेंनी धुडकावली ; नरेश म्हस्केंची ठाणे जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती

गेल्या अनेक वर्षांपासून असलेली अतिरिक्त पाण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झाली असून वागळे व दिवा परिसरातील पाणी प्रश्न सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आपला मुख्यमंत्री.. आपला अभिमान असल्याचे सांगत गेल्या अनेक वर्षाची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मंजूर झाली असल्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, नगरअभियंता अर्जुन अहिरे, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत सोनाग्रा आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ठाणेकरांना अतिरिक्त पाणीपुरवठा मंजूर केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com