उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदे गटाचा नवा डाव; मुख्यमंत्री स्वत; घेणार पुढाकार

मुंबईमध्ये ताकद वाढवण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama

Eknath Shinde : मुंबई : राजकीय संघर्ष वाढवून शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शह देण्याच्या हेतुने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रोज नवे डाव टाकत आहेत. आपल्या गटाचे बळ वाढविण्यासाठी एकनाथ शिंदे हे आता गणेश मंडळांना 'हायजॅक' करण्याच्या तयारीत आहेत.

त्यासाठी ६ ते ८ सप्टेंबर या तीन दिवसांत एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्यांची ताकद असलेल्या मंडळांना भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाआडूनही शिंदे हे उद्धव ठाकरे यांना धक्के देण्याची शक्यता आहे. सत्तासंघर्ष संपल्यानंतर ठाकरे व शिंदे यांच्यात आता पक्ष संघटनेवरच्या ताब्यावरून लढाई सुरू आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
'शिवसेनेचे मुंबई महापालिकेत 'मिशन 150'!'

'शिवसेना आपलीच असल्याचा दावा ठोकताना एकनाथ शिंदे हे ठाकरे यांच्याकडचे नेते, कार्यकर्त्यांना आपल्या गोटात ओढत आहेत. राज्याच्या बहुतांशी भागापाठोपाठ मुंबई आणि उपनगरांमधील ठाकरे यांचे कार्यकर्ते फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटाला मुंबईत कार्यकर्त्यांचे जाळे विस्तारायचे आहे. त्यासाठी खुद्द शिंदे यांनीच जोरदार प्रयत्न चालविले आहे.

त्यातून गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांचा उत्साह ऐन भरात येताच एकनाथ शिंदे यांनी गाठीभेटीचा कार्यक्रम आखला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे शनिवारी झालेल्या एका बैठकीत काही कार्यक्रम निश्चित करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार?; मुंबई महापालिकेचे धोरण ठरणार महत्त्वाचे

उद्धव ठाकरे हे यंदा दणक्यात दसरा मेळावा घेण्याच्या मनःस्थितीत आहेत. दुसरीकडे शिंदे गटही रोज नवनवे दावे करीत, शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याचे प्रयत्न करीत आहे. मेळाव्यानिमित्तही ठाकरे-शिंदे गट आमनेसामने आले आहे. मेळाव्याच्या परवानगीच्या मुद्याला तूर्त फारसे महत्त्व देण्याऐवजी मेळावा घेऊन लोकांची गर्दी जमविण्याच्या उद्देशाने शिंदे गटाने आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत, त्यामुळे येत्या काळात शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये जोरदार राजकीय सामना रंगणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com