एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी `वर्षा` सजले...

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच वर्षा निवासस्थानी राहायला जाणार आहेत
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लवकरच त्यांच्या नंदनवन या शासकीय निवास्थानावरून "वर्षा" या मुख्यमंत्र्यांनसाठी असणाऱ्या शासकीय निवासस्थानी मुक्काम हलविणार आहेत. मात्र, `वर्षा`वर मुक्काम हलविताना ते आपला 'नंदनवन' या बंगल्याचा ताबा कायम ठेवणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे वर्षा येथे राहायला येणार असल्याने या बंगल्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली असून बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांच्या नावाची पाटी लावण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यापासून गेले 40 दिवस हा बंगला रिकामाच आहे. ठाकरे यांनी आपले सर्व साहित्य एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर हलवले होते. आता शिंदे व त्यांचे कुटुंब लवकरच नव्या बंगल्यात राहावयास येईल. शिंदे आडनावाचे दोन मुख्यमंत्री हा बंगला तेव्हापासून पाहील.

वर्षा हा शासकीय बांगला मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान म्हणून परिचित आहे. त्यामुळे वर्षा बंगला हा सत्तेचा केंद्र मानला जातो. पर्यायाने सत्ताकारणात वर्षाचे स्थान अनन्यसाधारण आहे. शिंदे यांच्या बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वर्षा निवासस्थान सोडले होते. तेव्हापासून हे निवासस्थान रिक्त आहे.

Eknath Shinde
देहू संस्थानच्या जुगारी विश्वस्ताची हकालपट्टी होणार : अध्यक्ष मोरेंनी दिले संकेत

एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तरीही त्यांनी नंदनवनवरून आपला मुक्काम हलविला नव्हता. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभरातील नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे नंदनवन बंगला अपुरा पडू लागला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नंदनवन हा पोलिसांसाठी गैरसोयीचा असल्याने मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार लक्षात घेऊन शिंदे यांनी वर्षावर मुक्कामाला यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

Eknath Shinde
पंढरपुरातील राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला; शहाजीबापूंनी लावली फिल्डिंग!

त्यानुसार शिंदे लवकरच वर्षावर जाणार आहेत. गेल्या सात-साडेसात वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शिंदे यांच्यासाठी नंदनवन बंगला फलदायी ठरला आहे. त्यामुळे वर्षावर मुक्काम हलविताना शिंदे हे नंदनवनचा ताबा स्वतःकडे ठेवणार असल्याचे समजते. सध्या शिंदे यांच्याकडे नंदनवन आणि अग्रदूत असे दोन बंगले आहेत. २०१४ मध्ये शिंदे यांचा पहिल्यांदा फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून समावेश झाला होता. तेव्हा त्यांना नंदनवन बंगला मिळाला होता. तेव्हापासून शिंदे यांच्याकडे नंदनवन बंगला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in