मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा देणार उद्धव ठाकरेंना धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा; नारायण राणेंसह भाजप नेत्यांना देणार आमंत्रण
Uddhav Thackeray-Eknath Shinde
Uddhav Thackeray-Eknath ShindeSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. शिवाजी पार्कवर (shivaji Park) दरवर्षी भरणारा दसरा मेळावाच (Dussehra Melava) हायजॅक करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत एकनाथ शिंदे हे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार आहेत. विशेष म्हणजे या दसरा मेळाव्यास केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप नेत्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (Chief Minister Eknath Shinde will hold Dussehra Melava at Shivaji Park ground)

शिवसेना दसरा मेळावा आणि मुंबईतील शिवाजी पार्क मैदान हे नाते अतूट आहे. पण, आता याच मुद्यावरून शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्री शिंदे हे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा आयोजित करण्याच्या तयारीत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
काँग्रेस नेते अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीसांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास गुफ्तगू

या दसरा मेळाव्याला सर्व मंत्री आणि आमदारांनी उपस्थित राहावे, अशी सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांना केली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाही या वेळी निमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच, शिवसेना सोडून गेलेले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही बोलावण्यात येणार असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद बोलताना नारायण राणे यांनी ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा आयाेजित करावा आणि त्या मेळाव्यासाठी मला भाषणाला बोलवावे,’ अशी इच्छा व्यक्त केली होती.

Uddhav Thackeray-Eknath Shinde
महाराष्ट्रातील काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर; दोन माजी मंत्री शिंदे सरकारमध्ये पुन्हा होणार मंत्री

एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत जोरदार टक्कर देण्याच्या इराद्यात आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यात शिंदे हे जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in