Eknath Shinde News: ''...पण तुमच्यासारखं आत्मक्लेश करायला गेलो नाही!''; मुख्यमंत्री शिंदेंचा अजितदादांना चिमटा

Maharashtra Assembly session : आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्त्व आहे.
eknath shinde - ajit pawar
eknath shinde - ajit pawarSarkarnama

CM Eknath Shinde Speech Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेतील राज्यपालांच्या अभिभाषणावेळी केलेल्या आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली. यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते अजित पवारांवरही शिंदेंनी निशाणा साधला. आघाडीसरकारच्या काळातील उध्दव ठाकरे यांनी आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच घोषणा होती. मात्र, आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही म्हणत उध्दव ठाकरेंना तर तुमच्यासारखं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आत्मक्लेश करायला जावं लागलं नाही असा चिमटा विरोधी पक्षनेते अजित पवारांना मुख्यमंत्री शिंदेनी काढला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तरे दिली. यावेळी लोकसेवा आयोगाऐवजी केंद्रीय निवडणूक असा उल्लेख केलेल्या मुख्यमंत्र्यावर विरोधी पक्षाकडून टीका करण्यात आली होती. त्यात अजित पवारांचाही समावेश होता.यावर प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तेच म्हणत आहे, लोकसेवा आयोग किंवा निवडणूक आयोगच तेच लावलं आहे. पण आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्त्व आहे.

eknath shinde - ajit pawar
Pune By-Election : कसब्यातील विजयातून महाविकास आघाडीला गवसला लोकसभेचा उमेदवार !

तसेच मी श्रेय घेत नाही, माझ्या पद्धतीने काम करतो. तिथले सगळे अधिकारी तुमच्या ओळखीचे आहे. मी त्यावर खुलासा केला, पण तुमच्यासारखं वसंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आत्मक्लेश करायला जावं लागलं नाही असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना लगावला.

तुम्ही जेव्हा शपथ घेतली होती, ठाण्यात तुमचा पुतळा जाळला होता. त्या सगळ्या घोषणा आमच्याकडे आहे. मात्र, आम्ही बंड केले त्यावेळी 10 वेळा लोकांना फोन करावे लागले होते. त्यावेळी ते बाहेर आले होते. कारण आम्ही खरी शिवसेना आहोत, त्यामुळे लोक आमच्याकडे येत आहे असंही एकनाथ शिंदे(Eknath Shinde) म्हणाले.

eknath shinde - ajit pawar
Maharashtra Budget Session : कसब्यातील पराभवानंतर मुख्यमंत्र्यांचं ठरलं; म्हणाले...

मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंना टोला

आधी फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी एवढीच घोषणा होती. मात्र आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही. आमची घोषणा आहे माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र ही आमचंं ब्रीद वाक्य आहे. आम्ही छोटा विचार करत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

...म्हणून तुम्हांला आमचं काम दिसत नाही!

सत्तेतून पायउतार झाल्यानंतर तुमच्या डोळ्यात अंधारी आली आहे. त्यामुळे आमचे काम दिसत नाही. दिसत असलं तरी तुम्ही बोलत नाही. चांगल्याला चांगलं म्हणण्याचं विरोधकांचं काम आहे, तुमचं मोती बिंदूचं ऑपरेशन करावं लागेल', असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in