जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल; मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

Eknath Shinde News : गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.
Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awhad, Eknath Shindesarkarnama

Eknath Shinde News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली. एका महिलेने आव्हाडांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. पोलीस नोंदवलेल्या गुन्ह्याची नियमानुसार पारदर्शक चौकशी करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तसेच कोणतीही कारवाई सूडबुद्धीने होणार नाही. आव्हाड यांना हे जर षडयंत्र वाटत असेल तर हे कुणी केले त्यांना माहिती असेल. राजकीय सूड भावनेने कुठलीही कारवाई नाही हे कायद्याचे राज्य, असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लोकशाही मार्गाने दाद मागायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Jitendra Awhad, Eknath Shinde
Jitendra Awhad : आव्हाडांना कोर्टाचा मोठा दिलासा; मुंब्रा पोलिसांना दिले 'हे' निर्देश

नियमानुसार काम करणारे हे सरकार आहे. आंदोलन ठिक आहे. मात्र, कुणी कायदा हातात घेतला तर कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रावादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. आव्हाड यांनी राजीनामा देऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP) यांनी आव्हाड यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आव्हाड म्हणाले, माझा जन्म 354 आणि 376 साठी झालेला नाही. माझ्यावर कोणताही आरोप केला असता तर चालले असते मात्र, 354 मला मान्य नाही. समाजात माझी मान खाली जाईल असा गुन्हा माझ्यावर टाकला जात असून हा कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला.

Jitendra Awhad, Eknath Shinde
जितेंद्र आव्हाडांसाठी अजितदादा मैदानात; ट्वीट मागे घेणार...

354 चा गुन्हा दाखल झाल्यावर माझ्या मुलीला अनेक जण प्रश्न विचारत आहे. एवढ्या खालच्या पातळीवर राजकारण होऊ नये, अशी खंत आव्हाड यांनी व्यक्ते कली. ही कारवाई माझ्या मनाला लागली. माझ्यावर खुनाचा आरोप लावला असता तरी चालले असते. विनयभंगाचा आरोप मान्य नाही, त्यापेक्षा राजकारणात नकोच असेही आव्हाड यांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com