मिलिंद नार्वेकरांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

आज आपल्या सर्वांचा वेगळा मूड आहे, तुम्हीपण त्या मूडमध्ये राहा.
Eknath Shinde-Milind Narvekar
Eknath Shinde-Milind NarvekarSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात दाखल होणार आहेत, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले हेाते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया आली आहे. (Chief Minister Eknath Shinde said about Milind Narvekar's entry into Shinde group...)

मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत स्पष्टपणे बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले. एका शालेय कार्यक्रमासाठी आले असल्यामुळे त्यांनी एक दिवस तरी विद्यार्थ्यांसाठी सोडा, असे म्हटले. दररोज आपल्याला तेच बोलायचे आहे. नार्वेकर यांच्या प्रवेशाबाबत मला काही माहिती नाही. आज आपल्या सर्वांचा वेगळा मूड आहे, तुम्हीपण त्या मूडमध्ये राहा. त्याचा सर्वांना फायदा होणार आहे, अशी मिश्किल टिप्पणीही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Eknath Shinde-Milind Narvekar
खेड काँग्रेसचा शेवटचा बुरूजही ढासळला; आक्रमक अमोल पवारांचा शिवसेनेत प्रवेश

कंगना राणावत हिच्या भेटीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मला अनेक लोक भेटायला येत असतात, भेटत असतात. पण मला अद्याप तरी त्यांच्या भेटीबाबत माहिती नाही. मी लपवून काही ठेवत नाही. मी एकदम ट्रान्सर्पंट असून ते तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहे. मी पोटात एक आणि ओठात असं कधीही करत नाही. माझं जे काही असतं ते स्पष्ट असतं.

Eknath Shinde-Milind Narvekar
राष्ट्रवादीला धक्का; आमदार बेनकेंच्या निष्ठावंताचा शिवसेनेत प्रवेश!

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंदे गटात सहभागी होणार आहेत. चम्पासिंग थापाने काय केले? ज्या थापाने त्याचे संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केले होते. तोदेखील ठाकरे यांना सोडून शिंदे गटात आला आहे. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

Eknath Shinde-Milind Narvekar
मल्लिकार्जून खर्गे यांचा मोठा निर्णय; विरोधी पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

शिंदे यांच्या बंडानंतर नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. शिंदे गणेशोत्सवात नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी पोहोचले होते. तसेच, शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवले होते, त्यामध्ये नार्वेकर यांचा समावेश होता. नार्वेकर हे ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com