CM Eknath Shinde: '' ज्यांना हात दाखवायचा होता, त्यांना 30 जूनलाच दाखवला...!''

आम्ही जे काही करतो ते उघडपणे करतो, लपूनछपून काहीच करत नाही. आणि दिवसाढवळ्या करतो.
Cm Eknath Shinde News
Cm Eknath Shinde News Sarkarnama

Eknath Shinde News : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची एकही संधी महाविकास आघाडीचे नेेतेेमंडळी सोडताना दिसत नाही. तसेच हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा देखील त्यांच्याकडून वारंवार केला जातो. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारच्या भवितव्य जाणून घेण्यासाठी सिन्नर येथील एका ज्योतिषाला हात दाखवल्याची चर्चा आहे. यामुळे विरोधकांना शिंदेंना कोंडीत पकडण्याची आयती संधीच मिळाली. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्य़मंत्र्यांना यावरूनच टोला लगावला होता. आता याच टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी पलटवार केला आहे.

Cm Eknath Shinde News
Sharad Pawar News : ''...त्यामुळे दौरा सोडून हात दाखवायला मी कधीच ज्योतिषाकडे जात नाही!''; पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, आम्ही जे काही करतो ते उघडपणे करतो. लपूनछपून काहीच करत नाही. आणि दिवसाढवळ्या करतो. काही लोक लपून छपून करतात, त्यामुळे आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी राज्यात जे महाविकास आघाडी सरकार होतं ते कुणाचं काम करत होतं. कुणासाठी चालवलं जात होतं हे सगळ्यांना माहिती आहे. ते सरकार सर्वसामान्यांना मान्य नव्हतं. म्हणून सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना आम्ही ३० जूनलाच चांगला हात दाखवला आहे. आणि माझ्यावर विश्वास होता म्हणूनच ५० आमदार आणि १३ खासदार सोबत आले.

Cm Eknath Shinde News
Devendra Fadnavis : शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ठाकरेंनाही द्यावीच लागते ; फडणवीसांनी डिवचलं

बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं आहे. आणि आम्हांला कुठल्याही मंदिरात जाण्यासाठी अडथळा वाटत नाही. त्यामुळे कामाख्या देवीला जाणार आहे हेही मी जाहीरपणे सांगितलं आहे असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in