अमित शहांना भेटणार का? शिंदे म्हणाले, सरकारमध्ये तर त्यांचा महत्त्वाचा...

एकनाथ शिंदे (Ekhnath Shinde) यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
Amit Shah, Ekhnath Shinde
Amit Shah, Ekhnath Shindesarkarnama

Eknath Shinde : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. राज ठाकरे यांच्या घरातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचे मध्यंतरी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे भेट घेतली. राजकीय चर्चा काहीच झाली नाही, त्यामुळे समिकरणे वगैरे काही नाही. दिघे साहेबांच्या आठवणी निधाल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही सगळ्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्या आठवणी निघाल्या, असे शिंदे यांनी सांगितले.

Amit Shah, Ekhnath Shinde
मुंबई महापालिकेसाठी नवी समीकरणे? शिवसेनेला घेरण्याचा भाजपचा डाव

भविष्यात मनसेशी युती होईल का, असा प्रश्न विचारला असता, शिंदे म्हणाले, राजकीय चर्चा झालीच नाही. दसरा अजून पुढे आहे. गणपती आहे, नवरात्र आहे, त्यानंतर पाहू असे सांगत शिंदे यांनी बोलने टाळले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये येणार आहेत. त्यांची भेट घेणार का असा प्रश्न शिंदे यांना विचारला असता. ते म्हणाले, राज्यामध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार आहे. अमित शहा (Amit Shah) हे देशाचे गृहमंत्री आहेत, तसेच हे सरकार जे स्थापन झाले आहे, त्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Amit Shah, Ekhnath Shinde
काँग्रेसने दूर लोटलेल्या कलमाडींच्या कार्यक्रमाला भाजप नेत्यांची मांदियाळी!

त्यामुळे त्यांची भेट घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेटी दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा चर्चिल्या जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com