शिंदे गटाचा भाजपलाच धक्का; पक्षातील अनेक पदाधिकारी फोडले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आता भाजपलाच (BJP) खिंडार पाडले आहे.
CM Eknath Shinde,  Devendra Fadnavis
CM Eknath Shinde, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आता भाजपलाच (BJP) खिंडार पाडले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.२५ च्या भाजपच्या माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देत १२ खासदारांना आपल्या गटात आणले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनाही आपल्या गळाला लावले आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे.

CM Eknath Shinde,  Devendra Fadnavis
Nana Patole : ‘उद्या मुंबई गुजरातला गेली तरी आश्चर्य नाही’

मात्र, आता शिंदे गटाने ज्याच्या सोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्याच भाजपला मुंबईत धक्कादेत १०० पदाधिकाऱ्यांना गळाला लावले आहे. भाजपचे जास्त आमदार असतानाही शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. मात्र, आता शिंदे गटाने भाजपलाच लक्ष केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

CM Eknath Shinde,  Devendra Fadnavis
'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प : केसरकर म्हणतात, आता बस झालं!

भाजपमधील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्र.२५ च्या माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे या प्रवेशावरुन शिंदे गट आणि भाजपमध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com